





⇒आंबाठा प्रबोधन विद्यालयात ७७ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
⇒ दिव्य भारत बी. एस. एम. न्यूज वृत्तसेवा : ता.16 ऑगस्ट
⇒ सुरगाणा : ता.16 ऑगस्ट , ( प्रतिनिधी : एकनाथ शिंदे ) : आज प्रबोधन विद्यालय आंबाठा येथे ७७ वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून आंबाठा केंद्र प्रमुख श्रीमती. सोनवणे मॅडम उपस्थित होत्या. ध्वजारोहण श्रीमती. सोनवणे मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. ध्वजारोहण नंतर स्वातंत्र्य दिना निमित्ताने विविध गटांमध्ये देशभक्तिपर समूह गायन- स्पर्धा घेण्यात आली. सर्व वर्गातील सगळ्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. परिक्षण श्री. जाधव सर व श्री. निकमसर यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान विद्यालयाच्या मुख्यध्पापीका सि. थेरेसा यांनी भूषविले.
प्रास्ताविक कुमारी प्रियंका गायकवाड हीने केले. सूत्र संचालन कुमारी वैशाली चोधरी हीने केले. स्वतंत्र दिनाच्या निमित्त कुमारी. हर्षाली महाकाळ व तेजस्वीनी चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले. श्रीमती सोनवणे मॅडम यांनी आपल्या भाषणातून शाळेचे गोरव उद्गार करत तालुक्यातील एक आदर्श, शिस्तबद्ध गुणवत्ता निर्माण करणारी शाळा आहे. आभार कुमारी हीमेश्वरी गावित ने मांडले. मार्गदर्शक म्हणून श्री. सदगिर सर व श्री. देवरे सर होते. कार्यक्रमासाठी पालक-शिक्षक संघाचा सदस्य सौ. ललिता कुवर, सौ. उषा भोये, संस्था पदाधिकारी ब्रदर वीक्की सोरेन, सिस्टर एलीशा, फादर प्रफुल्ल, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, सर्व विदयार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
⇒
