





“स्वदेशीच्या वापराने देशाची अर्थव्यवस्था बळकट होते. “ –प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी
⇒ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा :: बुद्धवार, 16 ऑगस्ट 2023
⇒ नाशिक ,16 ⇒( प्रतिनिधी : छाया गिरी – लोखंडे ) नाशिक गोखले शिक्षण संस्थेच्या एस.एम. आर. के. महिला महाविद्यालयातील टेवसटाईल अँड अपेरल डिझायनिंग विभागातर्फे ह्या वर्षी ही ‘नॅशनल हँडलूम डे’ च्या निमित्ताने ‘ हँडलूम एक्झिबिशन कम सेल’ चे आयोजन दि. ८ ऑगस्ट रोजी करण्यात आले.
प्रदर्शनाचे उद्घाटन संस्थेच्या नाशिक विभागाचे सचिव प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी ह्यांच्या हस्ते झाले. आपल्या मनोगतात त्यांनी वरील उद्गार काढले . त्यांनी महाविद्यालयाच्या अशा विविध उपक्रमांचे महत्व स्पष्ट केले. आजच्या काळात ही हातमाग व स्वदेशी वस्तुंचे महत्व देशाच्या प्रगतीच्या दृष्टीने अत्यंत मोलाचे आहे. टेक्सटाईल व अपेरल डिझायनिंग विभागातर्फे आयोजित प्रदर्शनाचे त्यांनी कौतुक केले .ह्या प्रसंगी व्यासपीठावर उपप्राचार्या डॉ. सौ नीलम बोकिल , वाणिज्य विभागाचे समन्वयक प्रा. डॉ. नितीन सोनगिरकर उपस्थित होते. संस्थेच्या सचिव व खजिनदार व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ. दीप्ती देशपांडे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
उद्घाटन समारंभाच्या प्रास्ताविकात महाविद्यालयाच्या उपप्राचार्या व टेक्सटाईल अँड अपेरल डिझाइनच्या विभागप्रमुख प्रा. डॉ.सौ. कविता पाटील ह्यांनी केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात भारतीय वस्त्र कलेचा विकास कसा झाला हे सांगितले. स्वातंत्र्य लढ्यात आपल्या स्वदेशी वस्त्रांचे महत्व त्यांनी स्पष्ट केले. त्या पुढे म्हणाल्या ह्या उपक्रमातून विद्यार्थिनींवर उद्योजकतेचे संस्कार करण्याचा आमचा मानस आहे. त्यांनी प्रमुख अतिथीचा परिचय करूत दिला.
ह्या प्रदर्शनात भारतातील विविध प्रांतातील हस्तकलेच्या वस्तु तसेच विद्यार्थिनींनी स्वतः बनवलेल्या वस्तुंचा समावेश होता. विद्यार्थिनी स्वतः त्या त्या प्रांतातील कलाकृतींचे वैशिष्टय स्पष्ट करून सांगत होत्या.
प्रा. तृप्ती ढोका हयांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व आभार प्रदर्शन प्रा. प्रज्ञा अभ्यंकर हयांनी केले. ह्या प्रदर्शनाला नाशिकमधील विविध शाळांनी भेटी दिल्या . कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते .
⇒ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले , मो . ८२०८१८०५१०
