





सायखेडा विद्यालयाचे क्रीडास्पर्धेत नेत्रदीपक सुयश
β⇒दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : मंगळवार : दि. २६ सप्टेंबर २०२३
β⇒ निफाड(सायखेडा) ता. २६( प्रतिनिधी:राजेंद्र कदम ):-येथील जनता इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेमध्ये नेत्रदीपक यश संपादन केले आहे. या स्पर्धेत तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेतून जिल्हा स्तरावर निवड झालेले खेळाडू ऋतुजा खालकर- २०० मीटर धावणे , शर्वरी गायकवाड ४०० मीटर धावणे , साक्षी जाधव ६०० मी. धावणे , तृष्णा जाधव ६०० मीटर धावणे , सुरज नागरे २०० मीटर धावणे , वैष्णवी राजोळे ८०० मीटर धावणे , प्रतिक देवकर तीन किलोमीटर चालले , आदित्य केलुकर- ६०० मीटर धावणे, तृतीय क्रमांक , प्रिन्सि पंडित -गोळा फेक तृतीय क्रमांक, आणि रिले संघ- द्वितीय क्रमांक विजयी झाले.
स्क्वॅश रॅकेट स्पर्धेत जिल्हास्तरावरून विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेले खेळाड :-
14 वर्षातील मुले – ओमकार घोरपडे जिल्ह्यात दुसरा , फरहान शेख तिसरा, चौदा वर्षे मुली संस्कृती जाधव -तृतीय , 17 वर्षे मुली – वैष्णवी ढेपले- जिल्ह्यात प्रथम, १९ वर्ष मुले आणि मुली – जनार्दन जाधव( तृतीय ) , श्रेया शिंदे (तृतीय ) या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावरून विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली .
मार्शल आर्ट किक बॉक्सिंग,जित कुने दो स्पर्धेत :-
विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली विद्यार्थ्यां :- निजाम शेख ,साई घोलप ,अथर्व शेजवळ , अमोल भालेकर ,स्वरूप आडांगळे ,प्रतिक्षा सानप ,आदित्य गवई
आग्रोमिटर स्पर्धेत स्तरावर खेळलेले विद्यार्थी :-
आदित्य खेलुकर ,वेदांत खालकर ,कृष्णा खालकर , संस्कृती बुचडे , श्रेया पोटे हे विद्यार्थी सहभागी होऊन या स्पर्धेतून राष्ट्रीय स्पर्धेसाठी संस्कृती बुचडे आणि श्रेया पोटे यांची निवड झाली आहे . या विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक माणिक गीते, हेमंत काळे यांचे मार्गदर्शन लाभले .
त्यांच्या यशाबद्दल मराठा विद्या प्रसारक समाजाचे अध्यक्ष डॉ. श्री सुनील ढिकले, उपाध्यक्ष विश्वास मोरे ,सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे, सभापती -बाळासाहेब क्षीरसागर, उपसभापती – देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी ,निफाड तालुका संचालक – शिवाजी गडाख, उच्च माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष स्वामी कमलाकांताचार्य महाराज, शालेय समितीचे अध्यक्ष विजय कारे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन गावले अभिनव शालेय समितीचे अध्यक्ष जगन्नाथ डेरले, मविप्रचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक ) डॉ. भास्कर ढोके , शिक्षणाधिकारी तथा प्राचार्य डॉ. डी .डी .लोखंडे शालेय समिती सदस्य – संजय कांडेकर ,सौ चंद्रकलाताई गडाख ,प्राचार्य – नवनाथ निकम, पर्यवेक्षक -दौलत शिंदे , सर्व शालेय समिती सदस्य ,सर्व शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी त्यांनी त्यांचे कौतुक केले.
β⇒ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले : मो. ८२०८१८०५१०
