





गुगलने शोधला बेपत्ता युवकाचा मृतदेह
β⇒दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि . २५ सप्टेंबर २०२३
β⇒ नाशिक, ता २५ ( खास प्रतिनिधी ) :- गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या १६ वर्षीय युवकाचा मृतदेह सोमवारी गोदावरी नदीवरील कटारिया पुलाखालील झुडपात आढळून आला. शहर पोलिसांच्या श्वान पथकातील ‘गुगल ‘ने हा मृतदेह शोधून काढला . अनंत सिद्धार्थ शेजुळे रा. गंगापूर रोड असे मृत युवकाचे नाव आहे.
अनंत हा दोन दिवसांपासून घरातून बेपत्ता असल्याची नोंद पोलिसांकडे होती . पोलिसांकडून शोध सुरू असताना शहर पोलीस दलातील स्वान पथकातील पथकाची मदत अनंतच्या शोधासाठी घेण्यात आली. बेपत्ता आनंदच्या चपलांचा गंध गुगल ला सुगंविण्यात आली होती . त्यानंतर गोदापात्रात कटारिया पुलाखाली अनंत चा मृतदेह दुपारी अडीच ला शोधून काढला . अनंत ने आत्महत्या केली कि त्याचा घातपात झाला यासंदार्भात गंगापूर पोलीस तपास करीत आहेत .
β⇒ दिव्य भारत बीएसएम न्यूज: मुख्य संपादक : डॉ भागवत महाले : मो . ८२०८१८०५१०
