





➤ नाशिकरोड, ता. १ ( दिव्य भारत वृत्तसेवा ):- गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात सोमवार दि.१ मे रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त महाविद्यालयातील जिमखाना मैदानावर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी ध्वजारोहण केले . याप्रसंगी महाराष्ट्र राज्य गीत वाजवण्यात येऊन ध्वजास मानवंदना देण्यात आली . त्यानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना प्राचार्या डॉ मंजुषा कुलकर्णी यांनी सांगितले की,” देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्राने हिरिरीने सहभाग घेतला आहे तसेच प्राचीन संस्कृतीचा ऐतिहासिक वारसा सांभाळतानाच देशाच्या विकासातही योगदान दिले आहे , असे सांगून महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी उपप्राचार्य डॉ.अनिलकुमार पाठारे , डॉ. आकाश ठाकूर , कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या सौ.सुनिता नेमाडे, पर्यवेक्षिका सौ. प्रणाली पाथरे, लेफ्टनंट विजय सुकटे, डॉ. शशिकांत साबळे, विद्यार्थी कल्याण मंडळाचे डॉ. विशाल माने , विद्यार्थी सभा कार्याध्यक्ष , प्रा. लक्ष्मण शेंडगे , महिला अधिकारी डॉ. अर्चना पाटील , कुलसचिव राजेश लोखंडे यासह नाशिकरोड केंद्रातील पदाधिकारी , एम.एस.जी. तंत्रनिकेतनच्या प्राचार्या श्रद्धा देशपांडे व स्टाफ , सर्व शाळा मुख्याध्यापक, विभागप्रमुख व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक आदी उपस्थित होते.