β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक :सोमवार : दि, 23 सप्टेंबर 2024
β⇔येडशी,दि, 23(प्रतिनिधी : सुभान शेख ):- गौरी-गणेश उत्सवाच्या निमित्ताने राज्य शासनाने सप्टेंबर 2024 मध्ये शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा देण्याचे जाहीर केले होते. दिव्य भारत बीएसएम न्यूज मध्ये ”स्वस्त धान्य दुकाने आनंदाचा शिधा” वृत्त प्रसारित झाल्याने प्रशासने दाखल घेत आज शिधा आज प्राप्त झाला आहे. मात्र, धाराशिव पुरवठा विभागाकडे हा शिधा वेळेत उपलब्ध न झाल्यामुळे येडशीतील नागरिकांना प्रतिक्षा करावी लागली. दिव्य भारत बीएसएम न्यूज येडशी प्रतिनिधी सुभान शेख यांनी धाराशिव पुरवठा विभागाचे तात्पुरते चार्ज असलेले अधिकारी धवनकर यांच्याकडे विचारणा केली असता लवकरच शिधा उपलब्ध होईल असे त्यांनी सांगितले. अखेर, 21 सप्टेंबर रोजी संध्याकाळी धाराशिव येथून येडशीतील चारही स्वस्त धान्य दुकाने आनंदाचा शिधा प्राप्त झाला. 23 सप्टेंबर सोमवारपासून शिधापत्रिका धारकांना प्रत्येकी 100 रुपयात एक किलो साखर, रवा, सोयाबीन तेलाची पिशवी आणि चणाडाळ असे चार वस्तूंचे वितरण करण्यात आले. येडशीतील नागरिकांनी आनंदाचा शिधा उचलण्यासाठी उत्साहाने भाग घेतला. शिधा मिळाल्याबद्दल येडशीतील शिधापत्रिका धारकांनी धाराशिव पुरवठा विभागाचे अधिकारी धवनकर यांचे आभार मानले.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले :मो. 8208180510 (‘दिव्य भारत बीएसएम न्यूज’ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )
🅱️ : सुरगाणा(नाशिक):⇔”सामुदायिक विवाह हि काळाची गरज”-नरहरी झिरवाळ होय मी आदिवासी विकास मंत्री नव्हे, मात्र आदिवासी आहे, हे निश्चित-अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ-(प्रतिनिधी-रतन चौधरी)
3 days ago
🅱️:सायखेडा(नाशिक):⇔”शिक्षकांनी ज्ञानदानाबरोबर विद्यार्थी घडविण्याचे पवित्र कार्य करावे-सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे”-प्रतिनिधी-राजेंद्र कदम)
4 days ago
🅱️⇔नाशिक(शहर):⇔”गोखले एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आयोजित पद्मविभूषण श्री.रतन टाटा स्मृती व्याख्यान संपन्न”-(प्रतिनिधी-छाया लोखंडे)