गुरु उपदेश आचरणात आणून जीवन समृद्ध करा-प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी
दिव्य भारत बी..एस्स एम न्यूज : प्रतिनिधी – छाया लोखंडे -गिरी
नाशिक ता .३ ( दिव्य भारत बी.एस्स एम न्यूज) : – एस. एम.आर.के. महिला महाविद्यालयात गुरु पौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या नात्याने ते उपस्थित होते. त्यांनी पुढे ह्या दिवसाचे औचित्य समजावून सांगितले. भारतीय संस्कृतीतील तसेच आधुनिक काळातील थोर शिष्य परंपरा त्यांनी विविध उदाहरणांनी स्पष्ट केली. व्यासपीठावर ह्या प्रसंगी उपप्राचार्या डॉ. सौ .कविता पाटील, डॉ. सौ नीलम बोकिल , विद्यार्थिनी सभा प्रमुख प्रा. डॉ.विवेक खरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, पं. प्रा. डॉ. अविराज तायडे ह्यांनी केले. . त्यांनी तंत्रज्ञानाच्या ह्या काळात गुरुचे महत्व तितकेच किंबहुना अधिकच आहे.प्रा. प्रणेता निकुंभ ह्यांनी प्रमुख अतिथी प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी ह्यांचा व कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्या डॉ दीप्ती देशपांडे ह्यांचा परिचय करून दिला. उपप्राचार्य डॉ. कविता पाटील हयांनी गुरु शब्दाची व्याप्ती स्पष्ट केली. त्या म्हणाल्या निसर्गरूपी गुरुच्या सान्निध्यात आपले हृदय आनंदाने भरून जाते. गुरुचा कायम सन्मान ठेवण्याचा संदेश त्यांनी दिला.
अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राचार्या डॉ. सौ दीप्ती देशपांडे ह्यांनी आषाढ महिन्यातील एकादशीचे महत्व स्पष्ट केले. वारी म्हणजे गुरु – शिष्य प्रेमाचे उत्तम उदाहरण आहे भारताने गुरुच्या थोर परंपररेचा आदर्श जगा समोर ठेवला. कार्यकमाचे सूत्रसंचालन प्रा. अविराज तायडे ह्यांनी केले. कार्यकमाचे आभार प्रदर्शन प्रा. वैशाली गायकवाड ह्यांनी केले. कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
: येडशी(धाराशिव) :⇔येडशी येथे शांततेत रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी-(प्रतिनिधी-सुभान शेख )
1 day ago
: सुरगाणा(नाशिक):⇔”सामुदायिक विवाह हि काळाची गरज”-नरहरी झिरवाळ होय मी आदिवासी विकास मंत्री नव्हे, मात्र आदिवासी आहे, हे निश्चित-अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ-(प्रतिनिधी-रतन चौधरी)
4 days ago
:सायखेडा(नाशिक):⇔”शिक्षकांनी ज्ञानदानाबरोबर विद्यार्थी घडविण्याचे पवित्र कार्य करावे-सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे”-प्रतिनिधी-राजेंद्र कदम)
4 days ago
⇔नाशिक(शहर):⇔”गोखले एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आयोजित पद्मविभूषण श्री.रतन टाटा स्मृती व्याख्यान संपन्न”-(प्रतिनिधी-छाया लोखंडे)