





येडशीत ‘ईद ए मिलादुन्नुबी’ मोठ्या उत्साहात साजरी

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शनिवार : दि, 21 सप्टेंबर 2024
β⇔येडशी(धाराशिव),दि.21 (प्रतिनिधी : सुभान शेख ):- धाराशिव तालुक्यातील येडशी येथे दि.20 सप्टेंबर शुक्रवारी रोजी मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन हजरत जमादार बाबानगर येथुन मोठ्या उत्साहात ‘ईद ए मिलादुन्नुबी’ साजरी करण्यात आली. धाराशिव नुतन पोलिस अधीक्षक – संजय जाधव यांच्या आदेशानुसार ‘जश्ने ए मिलादुन्नुबी’ मिरवणूक काढण्यात आली होती. धाराशिव ग्रामिण पोलिस ठाणेचे पोलिस निरीक्षक – मारुती शेळके व उपनिरीक्षक – चंद्रकांत बनसोडे, जामा मस्जिदचे अध्यक्ष – जब्बार यासीन पटेल व मौलाना – अमजद पटेल आदीसह मुस्लिम बांधव उपस्थित होते.
यावेळी ‘जश्ने ए मिलादुन्नुबी’ मिरवणूकीत मोठमोठ्याने घोषणाबाजी करण्यात आली.’जश्ने ईद ए मिलादुन्नुबी’ मोहम्मद पैगंबर ची मिरवणूक गुरव गल्ली, नलावडे गल्ली, बलवंड गल्लीतील, सोयल सय्यद, आलम सय्यद, समीर सय्यद, फारुख सय्यद शकील शेख, आकील शेख आणि सुभान शेख यासह मुस्लिम बांधवांनी सर्वांनी सहभाग घेवून पोहे, सरबत, खाद्य पदार्थ वडापाव वाटप केले. जुने रोड, सोलापुर ते छत्रपती संभाजी नगर रोड वरील उद्योगपती – साई इंटरप्रायजेसचे दुकान मालक तानाजी जाधव यांनी पाण्याची बिस्लरी आणि बिस्कीट पुडे वाटप करण्यात आली. येडशी बसस्थानक परिसरात मुस्लिम बांधवांनी सरबत पिण्यासाठी व्यवस्था करण्यात आली. संभाजी नगर मध्ये ही सरबत पिण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती. येडशी गावातील ग्रामपंचायत कार्यालय समोर काही समाज बांधवानी मिरवणूकीत गुलाब जामुनची व्यवस्था केली आणि बलवंड गल्ली ते जामा मस्जिद दरम्यान मिरवणूक संपन्न झाली.
सदर मिरवणुकीत ठाकरे गटाचे-आमदार कैलास(दादा) पाटील, शिवसेना धाराशिव उपजिल्हा प्रमुख- विजयकुमार सस्ते, सुनील शेळके, विनोद पवार, मौलाना-सत्तार पटेल, रब्बी ऊल इस्लाम, हाफीज – रियासत, येडशी गावातील अकबर तांबोळी, संजय लोखंडे, हैदर पटेल, रफिक पटेल, शमशुद्दीन पटेल, अशपाक पटेल, सल्लाऊद्दीन शेख, सुभान शेख व धाराशिव ग्रामिण पोलिस ठाणेचे अंतर्गत असलेले सर्व पोलिस प्रशासन उपस्थित होते. जश्ने ईद ए मिलादुन्नुबी मिरवणूकमध्ये धाराशिव ग्रामिण पोलिस ठाणेचे पोलिस निरीक्षक – मारुती शेळके यांच्या उपस्थित चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा.
ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )