





बा-हे येथे ७ जानेवारीला सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त व्याख्यान

β⇔दिव्य भारत बीएस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : मंगळवार : दि. 2 जानेवारी 2024
β⇔बोरगाव, ता 2.( प्रतिनिधी – लक्षण बागुल ) :– नाशिक येथील मानवतावादी बहुउद्देशीय संस्था व राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने बा-हे येथील माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयात रविवारी (दि.७ जानेवारी) दुपारी १ वाजता व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बा-हे ग्रामपंचायत सरपंच वैशाली गावित राहणार आहेत. प्रमुख वक्ते म्हणून अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष ॲड. समीर शिंदे तर भारतीय घटना उद्देशिकेचे वाचन नितीन अहिरे करणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सहाय्य्क पोलिस निरीक्षक अनिल वाघ, ठाणगावच्या सरपंच मनिषा महाले, हुशार देशमुख, डॉ संजय चौधरी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमासाठी मनोहर जाधव, बाबुराव जाधव, केशव सोनवणे, सुदाम पालवी, युवराज जाधव परिश्रम घेत आहेत.
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज :मुख्य संपादक :डॉ भागवत महाले : मो. ८२०८१८०५१०