Breaking
आरोग्य व शिक्षणदेश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र

β : नाशिक:⇔ महाराष्ट्राच्या विकासाला समृद्ध करणारा समृद्धी महामार्ग : डॉ. भारती पवार-(प्रतिनिधी: डॉ भागवत महाले )

β : नाशिक:⇔ महाराष्ट्राच्या विकासाला समृद्ध करणारा समृद्धी महामार्ग : डॉ. भारती पवार-(प्रतिनिधी: डॉ भागवत महाले )

019707

महाराष्ट्राच्या विकासाला समृद्ध करणारा समृद्धी महामार्ग : डॉ. भारती पवार

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले :  मो. 8208180510
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले :  मो. 8208180510

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक :  सोमवार : दि, 04 मार्च 2024

β⇔: नाशिक: दि,3(प्रतिनिधी: डॉ भागवत महाले ):- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या “भरवीर ते इगतपुरी” या तिसऱ्या टप्प्याचे लोकार्पण राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण तथा जनजातीय कार्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या उपस्थितीत व सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते इगतपुरी पथकर प्लाझा, मौजे नांदगाव सदो तालुका इगतपुरी येथे संपन्न झाले.

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले :  मो. 8208180510
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले :  मो. 8208180510

                  समृद्धी महामार्ग हा अतिशय सरळ व सोपा असून मुंबई ते नागपूर या मुख्य शहरांसोबतच 15 जिल्ह्यांना जोडणाऱ्या समृद्धी महामार्गामुळे वेळेची मोठी बचत होणार असल्याचे सांगून केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार म्हणाल्या, देशाचा होणारा विकास हा HIRA (Highways, Infrastructure development, Railways & Airways) डेव्हलपमेंट म्हणून होत आहे. या चारही माध्यमातून देशाच्या विकासाला गती देण्याचे काम सुरू आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्यातील समृद्धी महामार्गाची भूमिका देखील महत्त्वाची असल्याचे त्या म्हणाल्या.
                 यावेळी आमदार हिरामण खोसकर, अजय बोरस्ते,काशिनाथ मेंगाळ, शिवराम झोले, गांगुर्डे बाबा ,योगेश चांदवडकर, गोरख घोडके,संपत काळे, रवी भागडे, किरण फलटणकर, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष डॉ. अनिलकुमार गायकवाड, समृद्धी महामार्गाचे सह व्यवस्थापक कैलास जाधव, मुख्य अभियंता एस. के. सुरवसे, उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनावणे, तहसीलदार रचना पवार यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले मो. 8208180510

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!