





सायखेडा विद्यालयात विद्यार्थ्यांनी घेतली स्वच्छतेची शपथ
β : सायखेडा :⇔ सायखेडा विद्यालयात विद्यार्थ्यांनी घेतली स्वच्छतेची शपथ- ( प्रतिनिधी : राजेंद्र कदम )
β⇔🎯दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शनिवार : दि.6 जानेवारी 2024
β⇔सायखेडा , ता 6 ( प्रतिनिधी : राजेंद्र कदम ) :- नाशिक येथील २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवानिमित्त आयोजित स्वच्छता मोहीम उपक्रमांची सुरुवात सायखेडा येथे जनता इंग्लिश स्कूलमध्ये करण्यात आली. यावेळी विद्यालयात उपस्थित सर्व विद्यार्थी, शिक्षक ,पालक यांना स्वच्छतेची शपथ नोडल अधिकारी सोमनाथ शिंदे यांनी दिली.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य नवनाथ निकम होते ते म्हणाले की स्वच्छतेच्या मोहिमेची सुरुवात आपल्या कुटुंबापासून करून ,आपला परिसर, गल्ली, गाव ,आपली शाळा ,आपला वर्ग यापासून केली तर स्वच्छतेचे महत्व निश्चितच नागरिकांच्या मनात बिंबवल्याशिवाय राहणार नाही. आरोग्याच्या दृष्टिकोनातून स्वच्छतेचे महत्व मानवी जीवनात नितांत आहे, हे जर आपण ओळखले तर अनेक भयंकर आजारापासून आपण दूर राहून आपलं आरोग्य चांगले राहू शकतो . यावेळी उपप्राचार्य शरद शेळके ,पर्यवेक्षक राम ढोली,शरद वाणी, विलास महाले, संजय बोरगुडे, संपत कांडेकर , महेंद्र मोरे,विजय सोनवणे, संजय चौधरी, ज्ञानेश्वर कर्पे, पंकज गांगुर्डे,सोमनाथ शिंदे, पद्माकर पंगे, ,सविता घुले, संगीता भारस्कर, सुवर्णा हिरे, वृषाली शिंदे ,प्रियंका राजोळे, तेजस्विनी शिंदे, प्रतीक्षा शिंदे, श्रीमती शिंदे, सतीश पोटे, कैलास माने सोमनाथ कांडेकर, राहुल कारे, अमोल कांडेकर, अरुण कांगणे ,श्री टरले, श्री थेटे,ग्रंथपाल श्री धनवटे आदी सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख अवधूत आवारे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार अशोक टर्ले यांनी मानले.
β⇔β⇔🎯दिव्य भारत बीएसएम न्यूज: मुख संपादक :: डॉ.भागवत महाले : मो. ८२०८१८०५१०