





सुरगाणा भाजप नगरसेवक,भाजपा तालुका अध्यक्षांचे प्रलंबित विकास कामासाठी बेमुदत उपोषण सुरु, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना घरचा आहेर

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांना अनेक निवेदने देऊनही एकही काम न झाल्याने उपोषण सुरु
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : मंगळवार : दि.2 जानेवारी 2024
β⇔बाऱ्हे,(सुरगाणा),ता.2 (प्रतिनिधी : दिपक देशमुख ) :- सुरगाणा तालुक्यातील अनेक समस्यांना कंटाळून सुरगाणा नगरपंचायत भाजप नगरसेवक विजय कानडे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी विविध विकास कामे न केल्याने भाजपा पदाधिकाऱ्यांनीच उपोषणाचे हत्यार उचलले असून लाक्षणीक उपोषण सुरू केले आहे. सदर आंदोलनात जाहीर पाठिंबा म्हणून भाजपा तालुका अध्यक्ष राजेंद्र निकुळे सहपदाधिकारी उपोषणास बसले आहेत. सुरगाणा तालुक्यातील विविध विकास कामे करण्यासाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांना अनेक वेळा निवेदान देवून देखील अद्याप कामे न सुरु झाल्याने उपोषण सुरु करण्यात आले आहे. निवेदनात म्हटल्याप्रमाणे आरोग्य, शिक्षण, पाणी, वीज, रस्ते, महसूल विभागातील समस्या यांचा समावेश असून, अनेक वर्षापासून या समस्या अजून जैसे थे आहेत. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांना आरोग्य मंत्री पद मिळाल्यानंतर आदिवासी जनतेच्या आशा अपेक्षा उंचावल्या होत्या,आरोग्य,शिक्षणसोयी सुविधा मिळतील,अशी अपेक्षा सुरगाणा तालुक्यातील जनतेला लागून होती, मात्र अद्याप ही अनेक प्राथमिक आरोग्य केंद्र सलाईनवर असून काही ठिकाणी पुरेशे कर्मचारी वर्ग, भौतिक सोय सुविधा,औषध तुटवडा,108 रुग्णवाहिका,102 रुग्णवाहिका,उपजिल्हा रुग्णालय सुरगाणा आदी सोयी सुविधा अद्यापही उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. सदर निवेदनाद्वारे वेळोवेळी समस्या मांडल्या परंतु एकाही आरोग्याची समस्या अद्यापही सुटली नाही. असे उपोषणकर्ते नगरसेवक विजय कानडे यांनी आरोग्य विषयक समस्या निवेदनासह विविध समस्या मांडल्या आहेत.
सुरगाणा तालुक्याच्या विकास कामासाठी भाजप नगरसेवक विजय कानडे व तालुका अध्यक्ष राजेंद्र निकुळे भाजपचे पदाधिकारी यांनी लाक्षणिक उपोषणाच्या माध्यमातून एक प्रकारे आरोग्यमंत्र्यांना घरचा आहेर दिला आहे. अशी तालुक्यात नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. सदर निवेदनात म्हटले , की सुरगाणा शहरातील अंगणवाडी दुरुस्ती, रिक्त पदे भरणे, उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त असलेल्या अधिकारी व कर्मचारी भरती करणे, सिटीस्कॅन मशीन व सोनोग्राफी मशीन त्वरीत रुग्णालयात उपलब्ध करून सोयी सुविधा करून देणे, सुरगाणा शहरातील बस स्टॉप सुशोभीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध असून ते काम सुरु करणे. महारष्ट्र राज्य परिवहन मंडळच्या बस नादुरुस्त असतात मध्येच बंद पडतात सुस्थितीत बस देणे,तहसील कार्यालयात येणाऱ्या जेष्ठ नागरिकांसाठी बसण्यासाठी आसन व्यवस्था आणि पाणी व्यवस्था करणे, विद्यार्थ्यांना वेळेवर शिष्यवृत्ती देण्यात यावी. शासकीय आश्रम शाळा, अंगणवाडी, माध्यमिक विद्यालय यांना पुरविण्यात येणारे आहारामध्ये चौकशी व्हावी. कमी दाबाचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा,जुनी विद्युत लाईन शहरातील बदलण्यात यावी,आदि मागण्या उपोषण करणारे भाजपाचे नगरसेवक विजय कानडे, राजेंद्र निकुळे यांनी केली आहे.
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले : मो ८२०८१८०५१०