β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार : दि, 30 ऑगस्ट 2024
β⇔ त्र्यंबकेश्वर, 30 (प्रतिनिधी :खास प्रतिनिधी ) :- ‘केंद्र सरकारच्या नवीन नियमावलीनुसार प्रत्येक खासगी आणि सार्वजनिक कंपनीला कंपनी सेक्रेटरीची नियुक्ती करणे बंधनकारक असल्याने विद्यार्थ्यांना करिअरच्या दृष्टिकोनातून कंपनी सचीव हा कोर्स म्हणजे मोलाची संधी आहे,असे प्रतिपादनवेस्टर्न इन्स्टिटय़ूट ऑफ रिसर्च कौन्सिलच्या प्रमुख राजश्री लंबे यांनी प्रतिपादन केले. म.वि.प्र.च्या कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करिअर जागरूकता कार्यशाळेत प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दिलीप पवार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दिलीप पवार म्हणाले, की “काॅमर्सच्या माध्यमातून कुशल मनुष्यबळाची निर्मिती होणार आहे. नकारात्मकतेची जागा जेव्हा सकारात्मकता घेते, तेव्हा प्रत्येक कुरूप गोष्टीमध्ये सुरूपता दिसू लागते. भाषिक व व्यावसायिक कौशल्यांच्या बळावर करिअरच्या संधी विद्यार्थ्यांना साद घालत आहेत. निर्णय चुकला तरी चालेल पण तो घेतलाच पाहिजे. विद्यार्थ्यांने कायम कृतीशिल असले पाहिजे, असे प्रतिपादन केले.
प्रा. श्रीमती नीता पुणतांबेकर यांनी प्रास्ताविकात कंपनी सेक्रटरी हा कोर्स विद्यार्थ्यांना दुरस्थ शिक्षणाच्या माध्यमातून ही उपलब्ध असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना करिअरच्या उत्तम संधी भविष्यात उपलब्ध होतील असे सांगीतले. प्रा. श्रीमती श्वेताली सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले. तर प्रास्ताविकात. प्रा. श्रीमती शाश्वती निरभवणे यांनी परिचय आणि आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डाॅ. वैशाली जाधव, प्रा. निलेश म्हरसाळे, प्रा. ह्रषीकेश गोतरणे, प्रा. संकेत भोर यांनी प्रयत्न केलेत. कार्यक्रमाला वाणिज्य शाखेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )
🅱️: येडशी(धाराशिव):⇔येडशी जनता विद्यालय बारावी निकालाची उज्वल परंपरा कायम-(प्रतिनिधी-सुभान शेख)
2 weeks ago
🅱️ : पुणे :⇔ प्रा. डॉ. सोमनाथ वाघमारे यांना ‘झुलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया’चे सीनियर सायंटिस्ट गोल्ड मेडल पुरस्कार प्रदान-(प्रतिनिधी-डॉ. भागवत महाले)
3 weeks ago
🅱️: नाशिकरोड:⇔बिटको महाविद्यालयात महाराष्ट्र दिन उत्सहात संपन्न-(प्रतिनिधी-संजय परमसागर)
3 weeks ago
🅱️:येडशी(धाराशिव):⇔धाराशिव गटविकास अधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघनप्रश्नी; श्रीमती.डांगे.पी.एम ग्रामपंचायत अधिकाऱ्याविरुद्ध प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी-(प्रतिनिधी-सुभान शेख)
4 weeks ago
🅱️ : सुरगाणा(नाशिक):⇔”सामुदायिक विवाह हि काळाची गरज”-नरहरी झिरवाळ होय मी आदिवासी विकास मंत्री नव्हे, मात्र आदिवासी आहे, हे निश्चित-अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ-(प्रतिनिधी-रतन चौधरी)
4 weeks ago
🅱️:सायखेडा(नाशिक):⇔”शिक्षकांनी ज्ञानदानाबरोबर विद्यार्थी घडविण्याचे पवित्र कार्य करावे-सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे”-प्रतिनिधी-राजेंद्र कदम)
4 weeks ago
🅱️⇔नाशिक(शहर):⇔”गोखले एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आयोजित पद्मविभूषण श्री.रतन टाटा स्मृती व्याख्यान संपन्न”-(प्रतिनिधी-छाया लोखंडे)