





एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठा युवा महोत्सवात एस.एम.आर.के. महिला महाविद्यालयाचे घवघवीत यश
β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि 14 ऑक्टोबर 2024
β⇔नाशिक,( शहर ) ता-18 ( प्रतिनिधी : छाया लोखंडे ):- एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाने एम.एम.पी. शाह कॉलेज, माटुंगा आणि एस.एन.डी.टी. विद्यापीठ चर्चगेट येथे नुकत्याच रोजी मुंबई बाहेरील महाविद्यालयांसाठी युवा महोत्सव २०२४-२५ चे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवात एस.एम.आर.के. महिला महाविद्यालयाने विविध प्रकारच्या स्पर्धांमध्ये सहभाग घेत यश संपादन केले आहे.
सदर स्पर्धेत महाविद्यालयातील नृत्य (लोकनृत्य आणि शास्त्रीय नृत्य), साहित्यिक कार्यक्रम (चर्चा, प्रश्नमंजुषा, वक्तृत्व, कविता वाचन), ललित कला (कोलाज, फोटोग्राफी, रांगोळी, कार्टूनिंग, पोस्टर मेकिंग), संगीत (शास्त्रीय गायन, लाइट व्होकल, वेस्टर्न व्होकल, इंडियन ग्रुप सॉन्ग, वेस्टर्न ग्रुप साँग), आणि थिएटर इव्हेंट्स (माइम, स्ट्रीट प्ले) अशा एकूण २१ कार्यक्रमांमध्ये भाग घेत या स्पर्धांमध्ये महाविद्यालयातील ४४ विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला. महाविद्यालयातील स्पर्धकांनी या महोत्सवात एकूण १६ बक्षिसे पटकावली. यशस्वी विद्यार्थिनींमध्ये निकिता जाधव, नगमा अन्सारी, एकता घुले, साक्षी जाधव, प्रतीक्षा जगताप, मोहक, वैष्णवी तेलंग, मृदांगी कुलकर्णी आणि सुहानी बारी यांचा समावेश आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव आणि खजिनदार प्राचार्या डॉ. दीप्ती देशपांडे, अध्यक्ष डॉ. आर.पी. देशपांडे, चेअरमन डॉ. सुहासिनी संत, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या खेडेकर, उपप्राचार्य डॉ. नितीन सोनगिरकर, आणि कला शाखेचे समन्वयक डॉ. अविराज तायडे यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले आहे.विद्यार्थिनींना या यशात विद्यार्थी सभेच्या प्रमुख प्रा. संगीता कांबळे, डॉ. अविराज तायडे, प्रा. गीतांजली गीते, प्रा. एस.एम. बगाडे, आणि प्रा. वैशाली गायकवाड यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो. 918208180510
ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )