





नाशिक जिल्हा परिषदेच्या दोन अधिकाऱ्यांना 11 हजाराची लाच घेताना रंगेहाथ अटक

β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार : दि 18 ऑक्टोबर 2024
β⇔वणी(दिंडोरी),ता.18 ( प्रतिनिधी :सुरेश सुराशे ):- नाशिक जिल्हा परिषदेच्या दोन अधिकाऱ्यांना 11 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. आरोपी अधिकारी किरण रंगनाथ दराडे (वय 40, कनिष्ठ लेखाधिकारी, वित्त विभाग, जिल्हा परिषद नाशिक) आणि सचिन प्रभाकर पाटील (वय 40, कनिष्ठ सहाय्यक, लेखा वित्त विभाग, जिल्हा परिषद नाशिक) अशी त्यांची नावे आहेत.
सदर घटनेची सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार शिक्षकांनी त्यांच्या आणि 17 इतर शिक्षकांच्या वेतन पडताळणीसाठी सेवा पुस्तके किरण दराडे यांच्याकडे जमा केली होती. दराडे यांनी वेतन पडताळणी करून ती लेखा अधिकारीकडे सादर करण्यासाठी 12,600 रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर ही रक्कम 11,000 रुपयांवर ठरवण्यात आली.किरण दराडे यांच्या सांगण्यावरून सचिन पाटील यांनी लाच म्हणून ही रक्कम स्वीकारली. ही रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगेहाथ पकडले. आरोपींविरुद्ध भद्रकाली पोलीस स्टेशन, नाशिक येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर आणि अप्पर अधीक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मीरा आदमाने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.
β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो. 918208180510
ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )