





सायखेडा विद्यालयात समाज दिन उत्साहात साजरा
β⇒ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा :: शनिवार, 19 ऑगस्ट 2023
β⇒ सायखेडा ,19 ( प्रतिनिधी : राजेंद्र कदम ) :- जनता इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय येथे मराठा विद्या प्रसारक संस्थेचे आद्य संस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात यांची जयंती समाजदिन म्हणून साजरी करण्यात आली. याप्रसंगी कर्मवीरांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.प्रारंभी समाजाच्या ध्वजाचे ध्वजारोहण शालेय समिती सदस्य मा.श्री संजय कांडेकर यांच्या हस्ते संपन्न झाले.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष श्री विजू आण्णा कारे होते. अध्यक्षपदावरून बोलताना ते म्हणाले की कर्मवीर रावसाहेब थोरात व त्यांचे सहकारी यांनी आर्थिक निधी जमा करून बहुजन समाजातील विद्यार्थी शिकला पाहिजे तो हुशार झाला पाहिजे. ज्ञानाची गंगा खेड्यापाड्यापर्यंत पसरली पाहिजे. हा त्यांचा ध्यास आज आपण वटवृक्षांमध्ये रूपांतर झालेला पाहताना दिसतो. खऱ्या अर्थाने शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानामुळेच हे शक्य झालं .कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य श्री नवनाथ निकम यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात त्यांनी सांगितले की शिक्षण क्षेत्रातील कर्मवीरांचा वाटा हा अतिशय अनमोल आहे ते आजही आपल्याला दीपस्तंभ सारखे वाटतात त्यांच्या कार्यापासून दिशा घेऊन आपले भविष्य घडवावे.
या कार्यक्रमास उच्च माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष कमलाकांताचार्य महाराज माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष विजु आण्णा कारे, अभिनव बालविकास शालेय समितीचे अध्यक्ष जगन्नाथ डेरले, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन गावले, पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष जगन आप्पा कुटे, सरपंच गणेश कातकाडे ,वसंतराव मोगल , अविनाश सुकेनकर , संजय मुरादे ,मनोज भुतडा ,रामनाथ फड ,श्री पावशे सर ,श्री पाटील सर ,बाळासाहेब कांडेकर ,अश्फाक शेख, भगवान कुटे ,गोरख कांडेकर, सुधीर शिंदे ,अप्पासाहेब काकड, दिलीप शिंदे पालक संघाचे उपाध्यक्ष श्याम सोनवणे ,साजिद पटेल, रामा कुटे, सौ हडपे अण्णा जाधव अभिनवच्या मुख्याध्यापिका श्रीमती बोरस्ते मॅडम पर्यवेक्षक दौलत शिंदे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थी व शिक्षक यांची भाषणे झाली. शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री नितीन गावले आपल्या भाषणात म्हणाले की शिक्षण क्षेत्रातील योगदानात कर्मवीरांचा सिंहाचा वाटा आहे. आजच्या विद्यार्थ्यांनी शिक्षणाची कास धरून आपले आयुष्य उज्वल करावे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अवधूत आवारे प्रतीक्षा शिंदे सीमा गोसावी संगीता भारस्कर यांनी केले संगीत शिक्षक श्री ज्ञानेश्वर करपे व गीतमंचने ” कर्मवीर हो ज्ञानवीर हो! लाख लाख वंदना ” सुमधुर आवाजात समाज गीत सादर करून उपस्थित त्यांची मने जिंकली. मेरी मिट्टी मेरा देश उपक्रमांतर्गत रांगोळी स्पर्धेच्या विजेत्यांचा, समाज दिनानिमित्त रांगोळी स्पर्धा, पुष्परचना स्पर्धा, निबंध स्पर्धा ,वकृत्व स्पर्धा घेण्यात आल्या त्यातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसाचे वाटप करण्यात आले .इयत्ता दहावी व बारावी प्रथम आलेल्या, शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र ठरलेल्या , राष्ट्रीय क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा शाखेकडे ठेवलेल्या ठेवी वरील व्याजाची रोख रक्कम बक्षिसाच्या रूपाने मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले .कार्यक्रमाचे आभार अशोक टरले यांनी मानले .या कार्यक्रमास संस्थेचे जेष्ठ सभासद, पंचक्रोशीतील नागरिक पालक विद्यार्थी, शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

β⇒ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले , मो . ८२०८१८०५१०
