Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजननोकरीब्रेकिंगमहाराष्ट्र

β : नाशिकरोड:⇔बिटको महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा संपन्न-(प्रतिनिधी:संजय परमसागर)

β : नाशिकरोड:⇔बिटको महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा संपन्न-(प्रतिनिधी:संजय परमसागर)

018501

बिटको महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा संपन्न 

β : नाशिकरोड:⇔बिटको महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा संपन्न-(प्रतिनिधी:संजय परमसागर)
β : नाशिकरोड:⇔बिटको महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा संपन्न-(प्रतिनिधी:संजय परमसागर)

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार  : दि, 16 सप्टेंबर  2024

β⇔नाशिकरोड,दि.16 (प्रतिनिधी:संजय परमसागर):-“नाशिकरोड महाविद्यालयाशी विविध नामवंत विद्यार्थ्यांचा एक अनुबंध निर्माण झाला आहे. शिक्षण महर्षी सर डॉ. मो. स. गोसावी यांच्या ८९ व्या जयंतीनिमित्त पवित्र स्मृतींना वदंन करून सरांनी शिक्षण क्षेत्राचा विस्तार केला आहे. विद्यार्थी देवो भव हे ब्रीद सातत्याने जपत आलेले आहे. नाशिकरोड कॉलेज एक कम्युनिटी कॉलेज आहे. शिक्षणासोबत कुशल नेतृत्वाची, संस्काराची कार्यशाळा निर्माण केली आहे. विविध उपक्रम, कार्यक्रम राबवले आहेत,”असे गोखले एज्युकेशन सोसायटीचे विभागीय सचिव डॉ. राम कुलकर्णी यांनी मार्गदर्शन करताना केले.
β : नाशिकरोड:⇔बिटको महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा संपन्न-(प्रतिनिधी:संजय परमसागर)
β : नाशिकरोड:⇔बिटको महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा संपन्न-(प्रतिनिधी:संजय परमसागर)
           गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात रविवार दि.१५ सप्टेंबर रोजी सेमिनार हॉलमध्ये नामवंत माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी उपस्थित माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख अतिथी संस्थेचे विभागीय सचिव प्रा. डॉ. राम कुलकर्णी, यासह विशेष अतिथी संस्थेचे नाशिकरोड शाखा सचिव डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी, कार्यक्रमाचे अध्यक्षा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ अनिलकुमार पठारे, डॉ. आकाश ठाकूर, आयक्यूएसी समन्वयक डॉ. के. सी. टकले या मान्यवरांसह आमदार सरोज अहिरे, योगेश घोलप, माजी न्यायाधीश प्रकाश ताजनपुरे, नामको बँकेचे उपाध्यक्ष प्रशांत दिवे, उद्योजक हेमंत गायकवाड , व्यावसायिक सोमनाथ राठी, सरपंच महासंघ अध्यक्ष बाळासाहेब म्हस्के, शैलेश ढगे,भारत निकम, प्रकाश कोरडे, विक्रम कदम , अतुल धोंगडे, उमेश भोईर, हेमंत चौधरी,दीपक पाटील, योगेश देशमुख, समता बँकेचे अध्यक्ष रमेश औटे, योगेश गाडेकर, व्यापारी बँक उपाध्यक्ष मनोहर कोरडे, नितीन धानापुरे, जतीन रावल, मुकुंद वैद्य, गौरव शिंपी, मुकुंद वैद्य, प्रतीक ताजनपुरे आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. प्रस्ताविक डॉ.अनिलकुमार पठारे यांनी केले.
             विशेष अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी यांनी नाशिक रोड महाविद्यालयाशी असलेली नाळ, आपुलकी, भावना, आदर, प्रेम ऋणानुबंध असेच यापुढेही राहील. महाविद्यालयाचे नाव, प्रतिष्ठा, लौकिक, वाढवण्यासाठी आपले महत्त्वाचे योगदान असल्याचे सांगितले . यावेळी माजी विद्यार्थी प्रकाश ताजनपुरे, हेमंत गायकवाड, सोमनाथ राठी, प्रशांत दिवे, प्रकाश कोरडे, विक्रम कदम, मनोहर कोरडे, प्रशांत दिवे, शैलेश ढगे, भारत निकम, दीपक पाटील, बाळासाहेब म्हस्के, रोहन देशपांडे आदी माजी विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त करतांना महाविद्यालयीन शिक्षणासोबत योग्य संस्कार घडून मोठे झाल्याचे सांगत गत रम्य आठवणींना उजाळा देत महाविद्यालयाच्या विकासासाठी ऋणानुबंधातून सहकार्य करून कटीबद्ध राहू अशी ग्वाही दिली.
             अध्यक्षीय मार्गदर्शन करताना प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी बोलतांना महाविद्यालयात एकूण २७ विभागांच्या माध्यमातून अनेक शाखा कार्यरत आहेत. आज माजी नामवंत विद्यार्थ्यांचा स्मृतिगंधाचा मेळावा असून अनुभवाच्या पुस्तकावर जशी स्वाक्षरी कट्टे असतात त्यातून निर्माण झालेल्या शिदोरींच्या आठवणींनी भावना ताज्या झाल्या आहेत यातूनच विचारांची आदानप्रदान होऊन सुसंवादाची मेजवानी मिळाल्याचे व समाजाभिमुख नेतृत्व करण्याचे भाग्य मिळाल्याचे सांगितले . या मेळाव्यास विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत असलेले १५० वर माजी नामवंत विद्यार्थी उपस्थित होते.
              कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुधाकर बोरसे यांनी केले तर आभार डॉ. लक्ष्मण शेंडगे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले :  मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा.
ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा.दिव्य भारत बीएसएम न्यूज” )

5/5 - (1 vote)

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!