





बिटको महाविद्यालयात राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री साजरी !

β⇒ दिव्य भारत बी.एस.एम न्युज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि. ०२ / १० / २०२३
β⇒ नाशिकरोड, ता. 2 ( प्रतिनिधी : संजय परमसागर ) :- गोखले एज्युकेशन सोसायटी नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात दि. २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले.यावेळी महाविद्यालय प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी प्रतिमापूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. आकाश ठाकूर , लेफ्ट. डॉ. विजय सुकटे ,राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. संतोष पगार , डॉ. उत्तम करमाळकर , जयंत भाभे यासह राजू कनोजिया, मयुरी बर्गे , शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी आदी उपस्थित होते.
β⇒ दिव्य भारत बी.एस.एम न्युज : मुख्य संपादक : डॉ.भागवत महाले : मो. ८२०८१८०५१०