सुरगाणा औद्योगिक प्रशिक्षण येथे राष्ट्रीय मतदार दिवस संपन्न
β : सुरगाणा शहर :⇔फोटो- सुरगाणा येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदीं याचे मार्गदर्शन प्रक्षेपित करण्यात आला होता,उपस्थित नवमतदार युवक, युवती. (प्रतिनिधी : रतन चौधरी)
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : रविवार : दि.28 जानेवारी 2024
β⇔सुरगाणा शहर, दि.28 (प्रतिनिधी : रतन चौधरी) :- राष्ट्रीय मतदान दिनाच्या निमित्ताने औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरगाणा येथे मतदारांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लाईव्ह नमो नवमतदार संमेलन कार्यक्रम औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांना मोठ्या पडद्यावर दाखविण्यात आला. या कार्यक्रमास केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांचे स्विय सहाय्यक डॉ. उमेश काळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या वेळी औद्यागिक प्रशिक्षण संस्था, नर्सिंग कॉलेज,कला व वाणिज्य महाविद्यालय येथील विद्यार्थी युवक-युवती नव मतदार मोठ्या संखेने उपस्थित, या कार्यक्रमा प्रसंगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य पी. के. बडगुजर मनोगत व्यक्त करून समस्त नवमतदारांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी आलेल्या मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा विद्यार्थी अध्यक्ष विजय कानडे यांच्या मार्फत करण्यात आले होते. या कार्यक्रमा प्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष कुंदन जावरे, भाजपा तालुका अध्यक्ष रमेश थोरात,संस्थेचे प्राचार्य पी. के. बडगुजर,उमेश काळे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शाम खैरनार,रतन चौधरी, मनोहर जाधव ,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज :मुख्य संपादक : डॉ भागवत महाले:मो. ८२०८१८०८१०
🅱️ :नागपूर:⇔ गुढीपाडवा: संपूर्ण सृष्टीसाठी शुभ,समृद्ध, नवचैतन्य व मांगल्याचे प्रतीक-(प्रतिनिधी-रमेश लांजेवार)
5 days ago
🅱️ : सुरगाणा (नाशिक):⇔कोल्हापूर रंगभूमीवर विधिनाट्य महोत्सवात आदिवासी कला संस्कृतीचे दर्शन ! कलाप्रेमी रसिकांना आदीम संस्कृतीची भुरळ; हजारो प्रेक्षकांनी घेतला आनंद !-(प्रतिनिधी-रतन चौधरी)
1 week ago
🅱️: वणी (नाशिक):⇔वणी येथे पुणेगाव धरण्याचा डाव्या कालव्यात पडून शाळकरी आठ वर्षीय बालकांचा आकस्मिक मृत्यू-(प्रतिनिधी-सुरेश सुराशे )
1 week ago
🅱️: निफाड( नाशिक):⇔सेवानिवृत्त शिक्षकांची अंशराशीकरणाची १२ लाखापेक्षा अधिक रक्कमेचा अपहार;साखळी उपोषण तदनंतर आमरण उपोषण-(प्रतिनिधी-रावसाहेब जाधव)