





टोमॅटो शेतीच्या आडून गांजाची लागवड; वणी पोलिसांची मोठी कारवाई
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : वणी : शुक्रवार : दि 13 डिसेंबर 2024
β⇔ वणी (नाशिक), ता.28 (प्रतिनिधी: सुरेश सुराशे ):- भातोडे शिवारातील टोमॅटो शेतीत गांजाची लागवड केल्याच्या गंभीर प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर वणी पोलीस स्टेशनच्या नेतृत्वाखालील पथकाने कारवाई केली. या कारवाईत नायब तहसीलदार विलास राव ढुमसे, दिंडोरी पोलीस निरीक्षक रंगनाथ शेखर, वणी पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुनील पाटील, उपनिरीक्षक गणेश कुटे, तसेच इतर पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. रंगनाथ चव्हाण या व्यक्तीने टोमॅटो शेतीच्या आडून गांजाची बेकायदेशीर लागवड केल्याचे उघडकीस आले. संबंधित पथकाने घटनास्थळी जाऊन गांजाची लागवड नष्ट केली आणि आरोपीविरोधात कायदेशीर प्रक्रिया सुरू केली. ही कारवाई पोलिसांच्या आणि प्रशासनाच्या एकत्रित प्रयत्नांमुळे यशस्वी ठरली. या घटनेवरून समाजातील अशा बेकायदेशीर कृत्यांविरोधात कठोर पावले उचलण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित होते. प्रशासनाने जनतेला अशा प्रकारांबाबत सतर्क राहून माहिती द्यावी, असे आवाहन केले आहे. त्या नंतर रात्री उशिरा पर्यंत वणी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आला आहे.
β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो. 918208180510