





विभागीय शालेय जलतरण स्पर्धेत बिटको कनिष्ठ महाविद्यालयाच्या जलतरणपटूंची चमकदार कामगिरी

β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि 14 ऑक्टोबर 2024
β⇔ नाशिकरोड, ता.14 ( प्रतिनिधी : संजय परमसागर ):- केंद्र व युवक सेवा संचालनालय पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या जलतरण तलावात नुकत्याच पार पडलेल्या विभागीय शालेय जलतरण स्पर्धेत गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कला, वाणिज्य व विज्ञान (बिटको) कनिष्ठ महाविद्यालयाच्या जलतरणपटूंनी उत्कृष्ट कामगिरी करून महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे.
या स्पर्धेत १९ वर्षाखालील मुला-मुलींच्या गटात बिटको महाविद्यालयाचे जलतरणपटू पार्थ सरोदे आणि मनस्वी खर्डे यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली. पार्थ सरोदे याने ५० मीटर आणि १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक या दोन्ही क्रीडा प्रकारांमध्ये कौशल्य दाखवत द्वितीय स्थान पटकावले. त्याचप्रमाणे, मनस्वी खर्डे हिने १०० मीटर आणि २०० मीटर बटरफ्लाय प्रकारांमध्ये देखील आपली चमक दाखवत मुलींच्या गटात द्वितीय क्रमांक मिळवला. या कामगिरीमुळे दोन्ही जलतरणपटूंची आगामी अमरावती येथे होणाऱ्या शालेय राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी, उपप्राचार्या सुनिता नेमाडे, पर्यवेक्षिका प्रणाली पाथरे, शिक्षक, आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक महेश थेटे यांचे मार्गदर्शन लाभले, ज्यामुळे त्यांनी आपले कौशल्य अधिकाधिक वृद्धिंगत केले. त्यांच्या यशामुळे महाविद्यालयाचा गौरव वाढला असून भविष्यातही अशीच कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो. 918208180510
ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )
.