चिकाडी जिल्हा परिषद शाळेत” जागतिक आदिवासी दिन “उत्साहात साजरा
“जय आदिवासी, एक तिर कमान, सारे आदिवासी एक समान, बिरसा मुंडा की जय ” अशा घोषणा घोषणांनी परिसर दुमदुमला !
⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज :सुरगाणा प्रतिनिधी :एकनाथ शिंदे
⇒ सुरगाणा , ता.९ ( दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा ) :- सुरगाणा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिकाडी येथे जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. यावेळी शाळेतील मुलांनी आदिवासी पोशाख घालून रॅलीमध्ये सहभाग घेतला.जय आदिवासी, एक तिर कमान, सारे आदिवासी एक समान, बिरसा मुंडा की जय. अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी भगवान बिरसा मुंडा याच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. शाळेचे शिक्षक राजाराम थवील , सरपंच सदू बागुल, भास्कर बागुल यांनी जागतिक आदिवासी दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले. मणिपूर महिला अत्याचार घटनेचा निषेध करण्यात आला , त्यानंतर इशाळवाडी रायगड येथील दरड कोसळून मृत्यूमुखी पडलेल्या आदिवासी बांधवाना भावपुर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी,शाळेचे मुख्याध्यापक श्री बागुल सर,शिक्षक राजाराम थवील विद्यार्थी व गावकरी उपस्थित होते.
⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक :डॉ भागवत महाले ,मो ८२०८१८०५१०
मुख्य संपादक- डॉ. भागवत महाले -दिव्य भारत बी.एस. एम. न्यूज
🅱️ :नागपूर:⇔ गुढीपाडवा: संपूर्ण सृष्टीसाठी शुभ,समृद्ध, नवचैतन्य व मांगल्याचे प्रतीक-(प्रतिनिधी-रमेश लांजेवार)
5 days ago
🅱️ : सुरगाणा (नाशिक):⇔कोल्हापूर रंगभूमीवर विधिनाट्य महोत्सवात आदिवासी कला संस्कृतीचे दर्शन ! कलाप्रेमी रसिकांना आदीम संस्कृतीची भुरळ; हजारो प्रेक्षकांनी घेतला आनंद !-(प्रतिनिधी-रतन चौधरी)
1 week ago
🅱️: वणी (नाशिक):⇔वणी येथे पुणेगाव धरण्याचा डाव्या कालव्यात पडून शाळकरी आठ वर्षीय बालकांचा आकस्मिक मृत्यू-(प्रतिनिधी-सुरेश सुराशे )
1 week ago
🅱️: निफाड( नाशिक):⇔सेवानिवृत्त शिक्षकांची अंशराशीकरणाची १२ लाखापेक्षा अधिक रक्कमेचा अपहार;साखळी उपोषण तदनंतर आमरण उपोषण-(प्रतिनिधी-रावसाहेब जाधव)