बिटको महाविद्यालयात इ.१२ वी बोर्ड परिक्षेतील गुणवंतांचा गौरव सोहळा संपन्न
दिव्य भारत बी. एस. एम. न्यूज : DIVYA BHARAT BSM NEWS : NASHIK,JUNE 7, 2023
दिव्य भारत बी. एस. एम. न्यूज – नाशिकरोड प्रतिनिधी : संजय परमसागर
नाशिकरोड ,ता. ६ ( दिव्य भारत बी. एस. एम. न्यूज ) : – गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको महाविद्यालयात सोमवार दि.५ जुन रोजी फेब्रुवारी/ मार्च २०२३ मध्ये झालेल्या इ.१२ वी कला, वाणिज्य व विज्ञान , एचएसव्हीसीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी पेढे, गुलाबपुष्प व गुणपत्रिका देऊन सन्मानित केले. याप्रसंगी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या सौ.सुनिता नेमाडे, पर्यवेक्षिका सौ. प्रणाली पाथरे, प्रा. जयंत भाभे , सौ. आर. एस. पाटील , शालिनी शेळके यासह शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी सचिन खैरनार ,सत्कारार्थी विद्यार्थी व पालक आदी उपस्थित होते. सत्कारार्थी विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी यथोचित मार्गदर्शन करताना आयुष्यात संस्काराला व आत्मविश्वासाला खूप महत्त्व आहे. सकारात्मक विचार आत्मसात करा , ध्येय ठरवून एकाग्रतेने सातत्याने प्रामाणिकपणे कष्ट करून त्यातूनच यशस्वी गवसणी शक्य होते. संस्थेचे ब्रीद विद्यार्थी देवो भव यातून सर्वांगीण विकास घडावा, यातूने सर्व शिक्षक कार्य करत असतात. म्हणून विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे सहकार्य महत्त्वाचे असते, असे सांगून भावी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या . याप्रसंगी काही विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना महाविद्यालयप्रती ऋण व्यक्त करून शिक्षकांनी मार्गदर्शन केल्याचे आवर्जून सांगितले . कार्यक्रमास गुणवंत विद्यार्थ्यांसह शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी व पालक उपस्थित होते . यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्यात आला. सदर निकाल प्रथम, द्वितीय व तृतीय अनुक्रमे खालीलप्रमाणे:-
कला शाखा :-
कु. मनस्वी कमलाकर पगारे (४५९/६००)- ७६.५० %
कुणाल संजय धुंलसंधीर (४५२/६००)- ७५.३३ %
कु. अपुर्व रमेश जाधव (४३०/६००)- ७१.६६%
वाणिज्य शाखा :-
कु. मोहम्मदसाद वसीमखान पठाण (५६९/६००)- ९४.८३ %
कु. दिव्या दीपक पवार (५५९/६००)- ९३.१७ %
कु. प्रिया महिंद्र वादिया( ५५९/६००) – ९३.१७ %
कु. सौम्या रमेश निमसे ( ५५९/६००) – ९३.१७ %
विज्ञान शाखा :-
कु. जिनेषा कोठारी (५१४/६००)- ८५.६७ %
साकिब झाहीर शेख (५०७/६००)- ८४.५० %
कु. रोशनी सुनील बोराडे (५०४/६००)- ८४.०० %
एच.एस.सी.व्होकेशनल शाखा :-
एम.एल.टी प्रथम- कु.सानिका संतोष भालेराव( ५१३/६००)- ८५.५० %
इएलटी प्रथम- ऋषिकेश सचिन परदेशी (३९२/६००)- ६५.३३%
ईटी प्रथम- इशान रमेश गज्जा (३२८/६००)- ५४.५७%
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त करताना शिक्षकांप्रती आदरभाव व्यक्त करून त्यांच्या मार्गदर्शनामुळे व पालकांच्या सहकार्यामुळेच सुयश प्राप्त झाल्याचे सांगितले.
दिव्य भारत बी. एस. एम. न्यूज : DIVYA BHARAT BSM NEWS : NASHIK,JUNE 7, 2023
दिव्य भारत बी. एस. एम. न्यूज : मुख्य संपादक – डॉ. भागवत महाले , मोब .नं. ८२०८१८०५१०
———————————————————————————————–
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा