Breaking
आरोग्य व शिक्षणदेश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र

β : नाशिकरोड :⇒बिटको महाविद्यालयात विज्ञान मंडळाचे उद्घाटन संपन्न  – ( प्रतिनिधी : संजय  परमसागर )

  β : नाशिकरोड :⇒बिटको महाविद्यालयात विज्ञान मंडळाचे उद्घाटन संपन्न  - ( प्रतिनिधी : संजय  परमसागर )

018501

बिटको महाविद्यालयात विज्ञान मंडळाचे उद्घाटन संपन्न 

 β : नाशिकरोड :⇒बिटको महाविद्यालयात विज्ञान मंडळाचे उद्घाटन संपन्न  - ( प्रतिनिधी : संजय  परमसागर )
β : नाशिकरोड :⇒बिटको महाविद्यालयात विज्ञान मंडळाचे उद्घाटन संपन्न  – ( प्रतिनिधी : संजय  परमसागर )

  β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : मंगळवार : दि 10 ऑक्टोबर 2023

  β⇒नाशिकरोड , ता 10  ( प्रतिनिधी : संजय  परमसागर ) :- “ प्लास्टिक हे जसे आवश्यक आहे, तसे त्याचे मिश्रण ही एक समस्या आहे . प्लास्टिकचा गैरवापर टाळा  पाहिजे हे  सांगताना  पुढे म्हणाल्या की,  जंक फूड व टेक्स्टाईल इंडस्ट्री यामुळे पर्यावरणास समस्या  निर्माण   होऊन मोठी हानी होत आहे . पृथ्वी ही माता आहे, तिला जपले पाहिजे .  बांबूपासून हजारो राख्या व नॅचरल अगरबत्ती बनवता येतात, शाळू मातीचा पुनर्वापर व्हायला हवा , प्लास्टिक हे कच्चे तेल यासारख्या नैसर्गिक सेंद्रिय पदार्थांपासून बनवले जाते . हरीत सामाजिक उद्योजकता ,पर्यावरणीय समस्यां व उपाय विकसित करता येतात. त्यायोगे निधी देऊन उपायांवर अंमलबजावणी केली जाते व ते पर्यावरणीय दृष्टीने अत्यावश्यक आहे ,” असे प्रतिपादन श्रीलता मेनन यांनी केले .
                     गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील बिटको कनिष्ठ महाविद्यालयातील विज्ञान विभागातर्फे विज्ञान मंडळाचे उद्घाटन करताना प्रमुख वक्त्या म्हणून ‘ हरित सामाजिक उद्योजकता – सामाजिक संस्था आणि युवकांची भूमिका ‘ या विषयावर मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या . याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख वक्त्या श्रीलता मेनन यासह महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी , कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या सौ. सुनिता नेमाडे , पर्यवेक्षिका प्रणाली पाथरे , श्री. मेनन , प्रा.रागिणी भवर आदी मान्यवर उपस्थित होते .

                         कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत सौ. सुनिता नेमाडे यांनी केले . कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्राचार्या डॉ. मंजुषा कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात पर्यावरणीय प्रदूषण रोखण्यासाठी एरंडेलचे पेट्रोल बनवणे , ऑरगॅनिक शेती तसेच शेणखताचा वापर योग्य रीतीने व्हावा असे सांगितले . कार्यक्रमास आदिती तोष्णीवाल , सुरेखा वसईकर , बी.निर्मल सर , मीनल पाटील , निलेश वाणी , राहुल पाटील , निरुपमा ताई आणि सुनील देशपांडे यासह विज्ञान शाखेचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रागिणी भवर यांनी केले तर आभार हर्षाली खैरनार यांनी मानले .

  β⇒दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादकडॉ भागवत महाले : मो.  ८२०८१८०५१० 

मुख्य संपादक- डॉ. भागवत महाले -दिव्य भारत बी.एस. एम. न्यूज
मुख्य संपादकडॉ. भागवत महालेदिव्य भारत बी.एस. एम. न्यूज
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!