





ग्लोबल वार्मिंगच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक कार्यासाठी भारत बहिरा यांना राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
ग्लोबल वार्मिंगमुळे होणाऱ्या हवामान बदलाच्या समस्येला लक्षात घेऊन, २०१५ पासून मी वृक्षारोपणाला विशेष प्राधान्य दिले आहे. विविध वृक्षारोपण कार्यक्रमांत सहभाग घेऊन हजारो वृक्षांची लागवड केली. याची दखल घेत, महाराष्ट्र शासनाच्या कला, संस्कृती व साहित्य विभागामार्फत २०१७-१८ साली मला पर्यावरण रत्न राज्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
२०१८-१९ आणि २०१९-२० या कालावधीत मी २२ रोजगार मेळावे आयोजित केले, ज्यामुळे २७०० हून अधिक युवकांना रोजगार मिळवून देण्यात यश आले. या कार्याची दखल घेत मा. पालकमंत्री नामदार एकनाथ शिंदे, ठाणे जिल्हाधिकारी आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत मला २०१९-२० साठी जिल्हा युवा पुरस्कार देऊन महाराष्ट्र शासनाने सन्मानित केले.
२०२०-२१ कोविड काळात मी १२६ कुटुंबांना दोन महिन्यांसाठी पुरेल इतके रेशन उपलब्ध करून दिले. तीन महिने सेल्टर बनवून दररोज ४००-५०० लोकांसाठी अन्नदानाची सोय केली. या कार्याची दखल घेऊन मला २०२१-२२ साली अभिमान महाराष्ट्राचा राज्य पुरस्कार देण्यात आला.
२०२४ च्या पावसाळ्यात, वन विभाग आणि महाराष्ट्र शासनाच्या मदतीने १ दिवसात १,१५,००० वृक्षांची लागवड करण्यात आली. या अनोख्या उपक्रमाची दखल घेत ध्येय उद्योग समूह आणि दैनिक युवा ध्येय यांच्या संयुक्त विद्यमाने २०२४-२५ साठी राज्यस्तरीय ध्येय गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हे पुरस्कार माझ्या पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक कार्यातील योगदानाचे प्रतीक आहेत.