





न्यू जलपाईगुडी येथे कांचनगंगा एक्सप्रेसला मालगाडीची धडक ; अपघातात 5 प्रवाशांचा मृत्यू ,२५ जखमी

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि, 17 जून 2024
β⇔न्यू जलपाईगुडी ( पश्चिम बंगला ) दि.17 (प्रतिनिधी :डॉ. भागवत महाले):- न्यू जलपाईगुडी येथे कांचनगंगा एक्सप्रेसला मालगाडीची धडक ; अपघातात 5 प्रवाशांचा मृत्यू ,२५ जखमी झाले आहेत. पश्चिम बंगालमध्ये एक मोठा रेल्वे अपघात झाला आहे. येथे मागून भरधाव वेगात आलेल्या मालगाडीने रुळावर उभ्या असलेल्या कांचनगंगा एक्सप्रेसला जोरदार धडक दिली असून या अपघातात आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला आहे.
एनजेपीहून सियालदहला जाणाऱ्या कांचनगंगा एक्स्प्रेसला सिलीगुडी ओलांडल्यानंतर रंगपनीर स्टेशनजवळ अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात रेल्वेच्या मागील बाजूच्या तीन बोगींचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात आतापर्यंत 5 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार, कांचनगंगा एक्स्प्रेसला रंगपाणी आणि निजाबारी दरम्यान अपघात झाला आहे.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज”)