





त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून उत्साहात साजरी

β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : बुधवार : दि 16 ऑक्टोबर 2024
β⇔त्र्यंबकेश्वर,ता.16 ( प्रतिनिधी : प्रा. ललिता सोनवणे ):-त्र्यंबकेश्वर येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय त्रंबकेश्वर येथे मराठी विभागामार्फत डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ग्रंथपाल डॉ. वर्षा जुन्नरे यांनी ग्रंथालयात विशेष पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन केले होते. वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी साध्या पोस्टकार्ड वरती डॉ. अब्दुल कलाम यांचे चित्र रेखाटून डॉ.कलामांचे संदेश अधोरेखित केले. हे आकर्षक पोस्ट कार्ड विद्यार्थ्यांनी शिक्षकांना भेट म्हणून दिले. याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध साहित्य प्रकारांचे अभिवाचन केले. वाचनास प्रेरणा मिळतील असे भित्तिपत्रके तयार करून वाचन विकसित करण्याविषयीचे संदेश त्यातून दिले.
प्राचार्य डॉ. दिलीप पवार यांनी आपल्या मनोगतातून वाचन संस्कृती कशी विकसित करता येईल याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, “पुस्तकाला आपला मित्र बनवा, कारण जो पुस्तकांना मित्र बनवतो, तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो. वाचनामुळे माणूस प्रगल्भ होतो.”

या कार्यक्रमास ग्रंथपाल डॉ. वर्षा जुन्नरे,डॉ. जया शिंदे, प्रा. वैशाली दामले, डॉ. सुलक्षणा कोळी, डॉ. मनीषा पाटील, प्रा.संदीप साळुंखे, प्रा. अनिल खेडकर, प्रा. विद्या जाधव, प्रा. शीतल पिंगळे, प्रा. स्वाती देशमाने यांसह अनेक विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. ललिता सोनवणे यांनी केले, आभार प्रदर्शन डॉ. जया शिंदे यांनी मानले, तर सूत्रसंचालन सोनाली इचाळे यांनी केले.
β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो. 918208180510
ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )