





जनता इंग्लिश स्कूल सायखेडा विद्यालयात योग दिन उत्साहात साजरा

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार : दि, 21 जून 2024
β⇔सायखेडा, दि.21 (प्रतिनिधी :राजेंद्र कदम):- जनता इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज व स्वामी षटकोपाचार्यजी महाराज महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानेआंतरराष्ट्रीय योग दिन महाविद्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाला. जनता इंग्लिश स्कूलचे प्राचार्य एन के निकम योग दिन महत्त्व सांगितले.यावेळी कॉलेजचे प्राचार्य डॉ. खैरनार सर यांनी प्रास्ताविक केले.
योगशिक्षक श्री उगले सर आणि अथर्व शिंदे यांनी उत्कृष्ट प्रात्यक्षिक दाखवून विद्यार्थ्यांकडून योगासने करून घेतले. त्यात ध्यानधारणा,ओंकार,अनुलोम- विलोम, ताडासन, वृक्षासन, अर्धचक्रासन, भद्रासन,अर्धउष्टासन, वज्रासन, शवासन, मकरासन, सर्वांगासन, पवन मुक्तासन, शारीरिक पूरक हालचाली करून घेतल्या शांतीपाठाने समारोप झाले. निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली म्हणजे योगासने.

सूत्रसंचालन कॉलेजचे क्रीडा संचालक श्री धोंडगे व माध्यमिक विद्यालय चे क्रीडा शिक्षक माणिक गिते यांनी केले. आभार प्रदर्शन विद्यालयाची पर्यवेक्षक राम ढोली यांनी केले. विद्यालयातील 852 विद्यार्थी 72 प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी 25 पालक आणि एनसीसी विद्यार्थी बोट क्लब खेळाडू या सर्वांनीच सहभाग घेऊन योगासनाची प्रात्यक्षिके केली.


β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज”)