





पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने जिल्हास्तरीय क्रिडा स्पर्धा

β⇔“दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा” वृत्तसेवा : नाशिक :गुरुवार : दि 10 नाजेवारी 2024
β⇔पुणे, ता. 10 ( प्रतिनिधी: विपुल धसाडे) :-“पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे या संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील विद्यार्थ्यांच्या कला, कौशल्यांना वाव देण्यासाठी विविध स्तरावर क्रीडा स्पर्धांचे आयोजन दिनांक 6 जानेवारी ते 13 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये करण्यात आले आहे. यामध्ये बुद्धिबळ, योगासने, कुस्ती, तायक्वांदो, कराटे, कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल व ॲथलेटिक्स या स्पर्धा घेण्यात येणार आहेत असे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव व सिनेट सदस्य सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अँड श्री संदीप कदम यांनी सांगितले ते पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या खराडी शैक्षणिक संकुलाच्या संयोजनाने कै. विठोबा मारुती पठारे क्रीडा संकुल खराडी येथे कुस्ती, तायक्वांदो, योगासने आणि कराटे या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

आजच्या प्रत्येक विद्यार्थ्याने उत्कृष्ट शिक्षणाबरोबरच उत्तम शारीरिक आरोग्य राखणे तसेच विविध खेळामध्ये प्राविण्य मिळवणे अत्यावश्यक आहे असे प्रतिपादन या उद्घाटन प्रसंगी वडगाव शेरी मतदार संघाचे मा.आमदार श्री बापूसाहेब पठारे यांनी व्यक्त केले. विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक तसेच मानसिक विकास होतो असे याप्रसंगी पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक मा. श्री महेंद्र आबा पठारे व आयर्नमॅन सौ रश्मी योगेश सातव यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये विविध शारीरिक कौशल्य विकसित असणे अत्यावश्यक आहे या ध्येयाने पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने विविध विद्यालयांमधून गटपातळी निवड झालेले 747 विद्यार्थी खेळाडू मोठ्या उत्साहाने सहभागी होणार आहेत, असे मत यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मा व्यवस्थापन सदस्य व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या खराडी येथील शंकरराव उरसळ फार्मास्युटिकल सायन्सेस रिसर्च सेंटर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ अशोक भोसले यांनी कार्यक्रमाच्या प्रास्ताविक करताना व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मा श्री अजितदादा पवार, उपाध्यक्ष श्री राजेंद्र घाडगे, मानद सचिव व सिनेट सदस्य सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अँड श्री संदीप कदम, खजिनदार श्री मोहनराव देशमुख, उपसचिव श्री एल एम पवार, सहसचिव श्री ए एम जाधव यांच्या मार्गदर्शनाने या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचे नियोजन व व्यवस्थापन खराडी संकुलातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थी स्वयंसेवक यांनी केले. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी श्री महादेव पठारे मा नगरसेवक, श्री बबन पठारे कुस्ती कोच, श्री शंतनु जगदाळे आयर्न मॅन, श्री योगेश सातव आयर्न मॅन, श्री दत्तात्रेय बंडावले सामाजिक कार्यकर्ते, श्री दत्तात्रेय सातव सामाजिक कार्यकर्ते, मा श्री विकास उंद्रे संचालक जे एस महानगर बँक, मा श्री प्रदीप कदम अजीव सदस्य पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, मा. प्राचार्य श्री प्रदीप निंबाळकर, तसेच पुणे जिल्हा शिक्षण मंडळ संस्थेच्या विविध महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ नितीन घोरपडे, डॉ झावरे, श्री लडके, श्री कळमकर, श्री सानप, श्री धावडे, श्री मेहेत्रे, सौ देशमुख डॉ. शेख, श्रीम. निर्मला सोही, श्रीम. अरुणा गुळुंजकर, श्रीम. शिल्पा खांडरे, श्रीम. रॉय आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात संस्थेच्या मल्लिकार्जुन महाविद्यालय न्हावरे येथील विद्यार्थी अथर्व नामदेव चव्हाण याने कुस्ती फ्रीस्टाइल नॅशनल ब्रांझ पदक मिळवल्याबद्दल मान्यवरांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.या स्पर्धेसाठी तायक्वांदो असोसिएशन पंच श्री मिलिंद पठारे , श्री प्रवीण शिंदे युवा कराटे ट्रेनिंग सेंटर, महाराष्ट्र स्टेट पंच श्री विशाल तरस, श्री मुकेश वाल्मीक व संस्थेच्या कुस्ती पंच यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार शंकरराव उरसळ डि. फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सचिन कोतवाल यांनी मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डि. फार्मसी विभाग प्रमुख डॉ सुजित काकडे व प्रा तृषा शंघ्रपवार यांनी केले.
β⇔“दिव्य भारत बीएसएम न्यूज :मुख्य संपादक :डॉ भागवत महाले : मो. ८२०८१८०५१०