





महापरिनिर्वाण दिन: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वणी येथे अभिवादन
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : वणी : शुक्रवार : दि 13 डिसेंबर 2024
β⇔ वणी (नाशिक), ता.28 (प्रतिनिधी: सुरेश सुराशे ):- वणी येथील अंगणवाडी कोळीवाडा 1 मध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि सामाजिक परिवर्तनाचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
कार्यक्रमात डॉ. आंबेडकर यांनी समाजासाठी केलेल्या योगदानाचा गौरव करण्यात आला. त्यांनी दिलेला समानतेचा संदेश, महिलांच्या हक्कांसाठी केलेल्या क्रांतिकारी सुधारणा, तसेच दिवाळी बोनस, प्रसूती रजा आणि सार्वजनिक क्षेत्रांतील आरक्षण यांसारख्या योजना यांची आठवण करून देण्यात आली.
या कार्यक्रमाला महिला, बालक आणि पालकांचा मोठा सहभाग होता. अंगणवाडी सेविका सौ. नंदाताई गांगुर्डे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर मदतनीस सौ. हौसा पवार यांनी उत्कृष्ट व्यवस्थापन करून कार्यक्रम यशस्वी केला.
हा कार्यक्रम डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी आणि समाजात त्यांचे कार्य अधोरेखित करण्यासाठी प्रेरणादायी ठरला.
β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो. 918208180510