β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार :दि. 19 जुलै 2024
β⇔येडशी (धाराशिव), ता.19 (प्रतिनिधी : सुभान शेख ):– धाराशिव तालुक्यातील येडशी येथे राष्ट्रीय राज्य महामार्ग “लातूर-बार्शी ” रोडवरील मोठे खड्डे पडले आहेत. हे खड्डे मागील काही वर्षांपूर्वी बुजवले गेले होते, परंतु नित्कृष्ट पद्धतीने काम केल्यामुळे ते पुन्हा पडले आहेत. खड्डे बुजवण्यासाठी पातळ डांबर आणि खडी वापरली जाते, ज्यामुळे खड्डे लवकरच उघडतात. फक्त पंधरा दिवसांत किंवा एका महिन्यातच हे खड्डे पुन्हा पडतात.
यु ट्युब चॅनल ‘दिव्य भारत बीएसएम न्यूज चॅनल’ चे येडशी प्रतिनिधी सुभान शेख यांनी राष्ट्रीय राज्य महामार्ग लातूरच्या अधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क साधला होता. अधिकाऱ्यांना माहिती मिळताच, त्यांनी तात्काळ दखल घेऊन खड्डे बुजवले, पण कामाची गुणवत्ता कमी होती. लातूर-बार्शी रोडवरील खड्डे बुजवण्यासाठी शासनाने अनेक वेळा निधी उपलब्ध करून दिला आहे. तरीही, काम अपूर्ण राहिले आहे. गुत्तेदारांनी खड्डे बुजवण्याचे काम अपूर्ण ठेवले आहे आणि या अगोदर दिलेल्या निधीचे पूर्ण वापर झाले नाही. शासनाने दिलेला निधी नेमका कुठे गेला याची तपासणी होऊन, दोषी गुत्तेदारांवर कडक कारवाई करावी. येडशीतील लातूर-बार्शी रोडवरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. पहाटेच्या वेळी पुण्याहून लातूरकडे जाणाऱ्या बसगाड्या या रस्त्यावरून जातात. खड्ड्यांमुळे अनेक अपघात झाले आहेत. सुग्रीव सोलवट खड्ड्यात पडून त्यांच्या हाताला इजा झाली आहे, शैलेश तपसे यांचे पाय निकामी झाले आहेत आणि दता तुपे यांच्या दोन्ही हातांना आणि पायांना गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेला जबाबदार कोण आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राज्य शासनाने लवकरात लवकर दखल घेऊन, लातूर-बार्शी रोडवरील खड्डे बुजवण्यासाठी दिलेल्या निधीची पाहणी करून चौकशीचे आदेश काढावेत आणि दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी येडशीतील ग्रामस्थांनी केली आहे.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले : मो. ८२०८१८०५१०
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमीशेअर व लाईक करा आणिसबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज”)
🅱️: येडशी(धाराशिव):⇔येडशी जनता विद्यालय बारावी निकालाची उज्वल परंपरा कायम-(प्रतिनिधी-सुभान शेख)
2 weeks ago
🅱️ : पुणे :⇔ प्रा. डॉ. सोमनाथ वाघमारे यांना ‘झुलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया’चे सीनियर सायंटिस्ट गोल्ड मेडल पुरस्कार प्रदान-(प्रतिनिधी-डॉ. भागवत महाले)
3 weeks ago
🅱️: नाशिकरोड:⇔बिटको महाविद्यालयात महाराष्ट्र दिन उत्सहात संपन्न-(प्रतिनिधी-संजय परमसागर)
3 weeks ago
🅱️:येडशी(धाराशिव):⇔धाराशिव गटविकास अधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघनप्रश्नी; श्रीमती.डांगे.पी.एम ग्रामपंचायत अधिकाऱ्याविरुद्ध प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी-(प्रतिनिधी-सुभान शेख)
4 weeks ago
🅱️ : सुरगाणा(नाशिक):⇔”सामुदायिक विवाह हि काळाची गरज”-नरहरी झिरवाळ होय मी आदिवासी विकास मंत्री नव्हे, मात्र आदिवासी आहे, हे निश्चित-अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ-(प्रतिनिधी-रतन चौधरी)
4 weeks ago
🅱️:सायखेडा(नाशिक):⇔”शिक्षकांनी ज्ञानदानाबरोबर विद्यार्थी घडविण्याचे पवित्र कार्य करावे-सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे”-प्रतिनिधी-राजेंद्र कदम)
4 weeks ago
🅱️⇔नाशिक(शहर):⇔”गोखले एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आयोजित पद्मविभूषण श्री.रतन टाटा स्मृती व्याख्यान संपन्न”-(प्रतिनिधी-छाया लोखंडे)