





देवळा तालुकाध्यक्ष-ओंकार रौंदळ तर निफाड तालुकाध्यक्ष -संदिप गायकवाड यांची निवड

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : बुधवार : दि, 6 मार्च 2024
β⇔दिंडोरी, दि.6(प्रतिनिधी:रावसाहेब जाधव):- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य सरचिटणीस/कार्यवाह संजय पगार यांच्या अध्यक्षतेखाली बी.आर.सी. हाॅल,पंचायत समिती देवळा तालुका येथे मेळावा पार पडला.
याप्रसंगी रावसाहेब जाधव तालुकाध्यक्ष दिंडोरी यांनी प्रास्ताविक करतांना म्हणाले की शिक्षक परिषद स्थापनेपासून आतापर्यंतचा केलेले कार्य त्यात आलेले यश याबद्दल प्रवास सांगितला. त्यानंतर गटशिक्षणाधिकारी सतीश बच्छाव यांनी मनोगतात शिक्षक परिषदेने केलेल्या कार्याचे कौतुक केले तर संजय पगार यांच्या माध्यमातून संघटनेला सक्षम ,अभ्यासु नेतृत्व लाभले. असे सांगितले. शिक्षक परिषदेने केलेले आंदोलने आपसी बदली,दिव्यांग न्याय्य लढा, वरिष्ठ वेतन श्रेणी आंदोलन, केंद्र प्रमुख आंदोलन, निवड श्रेणी आंदोलन विविध टप्पे यावर माहिती दिली. आदर्श संघटन,आदर्श कार्य करत आहे असे सांगितले.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य सरचिटणीस/कार्यवाह संजय पगार यांनी मार्गदर्शन करतांना कामाची पद्धत शासननिर्णय, न्यायालयीन लढे, आमरण उपोषण,धरणे आंदोलन विविध प्रश्नांवर अभ्यासपूर्ण आंदोलने करुन न्याय मिळवून दिला.आताच निवड श्रेणी व केंद्रप्रमुख पदोन्नती लढा आंदोलन यशस्वी झाले.देवळा तालुक्यातील शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी देवळा तालुका कार्यकारिणी कटिबद्ध आहे. असे सांगितले.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष वासुदेव बोरसे, जिल्हा कोषाध्यक्ष सुनील अहिरे, उपाध्यक्ष दिपक खैरनार, तालुकाध्यक्ष रावसाहेब जाधव (दिंडोरी),वैभव उपासनी (इगतपुरी), हेमंत रौंदळ (कळवण),संदिप गायकवाड (निफाड)अशोक पवार( AT), कैलास पाटोळे, सखाराम सोनवणे आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते. देवळा तालुकाध्यक्ष ओंकार रौंदळ, सरचिटणीस /कार्यवाह राजेंद्र जाधव तसेच निलकंठ येवला(कार्याध्यक्ष), शशिकांत अहिरे (कोषाध्यक्ष), गोपिनाथ जाधव(कार्यालयीन मंत्री), संजीव आहेर (प्रसिद्ध प्रमुख),दिपक जाधव (सहकार्यवाह), उपाध्यक्ष -संतोष चिमनपुरे, रमेश आहेर,बापु मोरे, किशोर खैरनार,रावबा मोरे(सल्लागार), महिला आघाडी -अरुणा सुर्यवंशी,लता पवार, प्रमिला देवरे,सूर्यकांता पगार तसेच सेवानिवृत्त प्रतिनिधी संजय ब्राह्मणकर, जयश्री पवार यांचे अभिनंदन करण्यात आले. देवळा तालुका सरचिटणीस राजेंद्र जाधव यांनी आभार मानले.
– “देवळा तालुक्यामध्ये शिक्षक परिषदेची सक्षम कार्यकारिणी देण्यात आली. देवळा पंचायत समिती स्तरावर निवड श्रेणी प्रस्तावा बाबत अचूक कामकाज केल्याने जिल्हास्तरावर कुठलीही अडचण आली नाही गटशिक्षणाधिकारी सतीश बच्छाव यांचे काम कौतुकास्पद. यापुढेही देवळा तालुक्यात कार्यकारणी व अधिकारी यांच्या समन्वयाने कामकाज उत्कृष्टपणे चालेल असा विश्वास”- संजय बबनराव पगार,राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज :मुख्य संपादक : डॉ भागवत महाले: मो 8208180510