





प्रा. डॉ. भागवत महाले यांना “क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले” ‘राष्ट्रीय आदर्श प्राध्यापक पुरस्कार’ प्रदान

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : रविवार : दि. 23 डिसेंबर 2024
β⇔नाशिक,ता.23 (प्रतिनिधी : शाश्वत महाले):-नंदुरबार येथील नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरम, नंदुरबार यासंस्थेतर्फे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त सामाजिक, शैक्षणिक , सांस्कृतिक , क्षेत्रातील विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीना भरती रेसिडेन्सी , नंदूरबार , येथील सभागृहात दरवर्षीप्रमाणे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी मराठा विद्या प्रसार समाज संस्थेच्या त्र्यंबकेश्वर येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. डॉ. भागवत शंकर महाले यांना नैसर्गिक मानवधिकार सुरक्षा परिषद फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष गोरख देवरे , प्रमुख पाहुणे व कार्यक्रमांचे अध्यक्ष जी.टी. पी. महाविद्यालयाचे प्राचार्य महेंद्र रघुवंशी यांच्या हस्ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले राष्ट्रीय आदर्श प्राध्यापक पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमास मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरमच्या नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ. ज्योती आर. लष्करी, सचिव प्रोटॉन संघटना उ. म .विद्यापीठ डॉ. जय भीम बागुल, गटशिक्षणाधिकारी अक्कलकुवा प्रशांत बी नरवडे, मिसेस ग्लोबल इंटरनॅशनल प्लॅनेट ब्युटी क्वीन डॉ. नूतन मिस्त्री , प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र राज्य सारांश भावसार , नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरम नॅशनल डायरेक्टर सायबर क्राईम गव्हर्मेंट ऑफ इंडिया प्रदीप कुमार अहिरे, शंकर महाले, सौ.वैशाली महाले, शाश्वत महाले आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होते.
डॉ. भागवत महाले यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत, शिष्यवृत्ती मार्गदर्शन, कौटुंबिक समस्या निवारण, वंचित नागरिकांसाठी आरोग्य व आर्थिक मदतीच्या उपक्रमांमध्ये मोलाचे कार्य केले आहे. शैक्षणिक उल्लेखनीय कार्य व योगदान: डॉ. महाले यांच्या शैक्षणिक योगदानामध्ये 45 हून अधिक आंतरराष्ट्रीय जर्नल्समधील रिसर्च पेपर्स, चार पेटंट्स, आणि तीन पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांनी शैक्षणिक, सामाजिक आणि संशोधन कार्यामध्ये 20 हून अधिक वर्षांपासून बहुमोल योगदान दिले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना राष्ट्रीय स्तरावर सन्मानित करण्यात आले आहे.
पुरस्कार प्रदान सोहळा : हा पुरस्कार सोहळा दिनांक 22 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10 वाजता ‘भारती रेसिडेन्सी’, करण चौफुली, जिजामाता कॉलेज रोड, नंदुरबार येथे संपन्न झाला. त्यांना आत्तापर्यंत 10 पुरस्कार मिळाले आहेत. डॉ. भागवत महाले यांना मिळालेल्या या सन्मानाबद्दल महाविद्यालयाचे मविप्र सरचिटणीस अँड नितीन ठाकरे, अध्यक्ष सुनिल ढिकले, संचालक अँड संदीप गुळवे, संचालक रमेश पिंगळे, संचालक डॉ.प्रसाद सोनवणे शिक्षणाधिकारी डॉ. नितीन जाधव, शिक्षणाधिकारी डॉ.भास्कर ढोके, शिक्षणाधिकारी ज्ञानेश्र्वर लोखंडे, शिक्षणाधिकारी डॉ विलास देशमुख, प्राचार्य डॉ. दिलीप पवार, प्रा. संदीप गोसावी, प्रा.प्रशांत रणसुरे , प्रा.योगेश मोहन, प्रा.मनोज मगर, दीपक महाले , रतन चौधरी, सखाराम पवार, सचिन हाडस आदीसह प्राध्यापक,विद्यार्थी, समाजातील विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो. 918208180510