Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरक्रिडा व मनोरंजनदेश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्रराजकियसंपादकीय

β : नागपूर:⇔नेताजी सुभाषचंद्र बोस भारताचे तेजोमय क्रांतीकारी योध्दा-(प्रतिनिधी: रमेश लांजेवार)

β : नागपूर:⇔नेताजी सुभाषचंद्र बोस भारताचे तेजोमय क्रांतीकारी योध्दा-(प्रतिनिधी: रमेश लांजेवार)

018501

                  २३ जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती 

            नेताजी सुभाषचंद्र बोस भारताचे तेजोमय क्रांतीकारी योध्दा
This contains: सुभाष चंद्र बोस जयंती पोस्टर, netaji subhash chandra bose, subhash chandra bose jayanti banner editing, how to make subhash chandra bose jayanti poster, subhash chandra bose jayanti, subhash chandra bose jayanti poster, mobile se poster kaise banaye, subhash chandra bose jayanti poster kaise banate hai, subhash chandra bos jayanti poster kaise banaen, subhash chandra bose jayanti poster kaise banaye, subhash chandra bose, subhash chandra bose jayanti banner kaise banaye, Netaji Subhash Chandra B

     β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : मंगळवार : दि.21 जानवरी 2025
  • β⇔नागपूर,ता.21(प्रतिनिधी: रमेश लांजेवार):- भारत स्वातंत्र्य करण्यासाठी देशात दोन नद्यांचा उगम झाला.एक मवाळवादी तर दुसरी जहालवालवादी यांच्या संगमानेच १५ ऑगस्ट१९४७ ला भारत स्वतंत्र झाला.२३ जानेवारी १८९७ला ओडिसा मधील कटक शहरात जन्माला आलेले नेताजी भारतासाठी चमकता तारा सिध्द झाले व स्वतंत्र भारतासाठी महान योध्दा म्हणून उदयास आले. नेताजींनी १५ वर्षाच्या वयातच स्वामी विवेकानंदांचे सर्व साहित्य वाचून काढले व देश निर्माण करण्याची ज्वाला प्रज्वलित झाली आणि देश स्वतंत्र करण्यासाठी संपूर्ण ताकदीनिशी संघर्षाला सुरुवात केली.कोलकत्यातील जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक देशबंधू चित्तरंजन दास यांच्या कार्याने नेताजी प्रभावीत झाले व त्यांच्या सोबत काम करायला सुरुवात केली.
    २० जुलै १९२१ रोजी महात्मा गांधी व सुभाषचंद्र बोस सर्वप्रथम एकमेकांना भेटले.यावेळी गांधींजींनीसुध्दा नेताजींना दासबाबू सोबत काम करण्याचा सल्ला दिला.कारण चित्तरंजन दास हे बंगाली वकील व भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील अग्रणी पुढारी होते.त्यामुळे त्यांना देशबंधू असे संबोधले जात असे. १९२५ साली इंग्रजांच्या लक्षात आले की नेताजी क्रांतीकारकांशी संबंध ठेवतात व क्रांतीकारकांचे स्फुर्तीस्थान असल्याचे त्यांच्या लक्षात आले.ह्या कारणास्तव इंग्रज सरकारने सुभाषबाबूंना अटक केली व कोणताही खटला न चालवीता त्यांना अनिश्चित काळासाठी  म्यांमारच्या कारागृहात बंदिस्त केले.नेताजींचा संपूर्ण प्रवास अत्यंत संघर्षमय व खडतड रहाला. कारण त्यांच्या व सहकाऱ्यांच्या रक्ताता-रक्तात स्वातंत्र्याची ज्वाला धगधगत होती.त्यांचे एकच स्वप्न होते ते म्हणजे भारत स्वतंत्र करणे यासाठीच त्यांनी विदेशी वारी करून इंग्रजाच्या दुश्मन राष्ट्रांशी हातमिळवणी करून भारतीय संघर्षाचा मोठा लढा आझाद हिंद सेनेच्या नेतृत्वात उभा केला. तेव्हाच १५ ऑगस्ट १९४७ ला स्वतंत्र भारत उदयास आला. कारण इंग्रजांना देशातून पळवून लावण्यात आझाद हिंद सेनेचा मोठा वाटा आहे. आझाद हिंद सेनेची स्थापना पहिल्यांदा २९ आक्टोंबर १९१५ ला राजा महेंद्र प्रताप सिगं यांनी केली.त्यावेळी आझाद हिंद सरकारची सेना म्हणून ओळखली जायची.यांचा उद्देश भारताला इंग्रजांपासुन स्वतंत्र करने.जेव्हा दक्षिण-पूर्वी एशियामध्ये जापानच्या सहयोगाने नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी ४० हजार भारतीय स्त्री-पुरूषांना प्रशिक्षीत करून सेनेत सहभागी  केले त्याला सुद्धा आझाद हिंद फौज असे नाव देण्यात आल्यानंतर सुभाषचंद्र बोस यांना आझाद हिंद सेनेचा सर्वोच्च कमाण्डर नियुक्त केल्यानंतर आझाद हिंद सेनेची संपूर्ण कमान नेताजी सुभाषचंद्र बोस यांना सोपविण्यात आली आणि सुभाषचंद्र बोस यांचा क्रांतीकारी लढा सुरू झाला.
    नेताजी १९३३ पासून १९३६ पर्यंत युरोपमध्ये रहाले.तो काळ जर्मनच्या हिटलरचा नाझीवाद आणि इटलीचे नेते मुसोलिनीचा फासीस्टवाद असा होता.यांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात सर्वतोपरी मदत करण्याचे वचन दिले.कारण या दोघांच्या निशाण्यावर इंग्लंड हाच देश होता. कारण इंग्लंडचे जगाच्या ७५ टक्के देशावर अधिपत्य होते. त्यामुळे इंग्लंडचा जगावर अतीरेक वाढत होता.कारण इंग्लंडने पहिल्या विश्व युध्दानंतर जर्मनीवर एकतर्फी करार लादण्यात आले होते.त्याचाच बदला जर्मनी इंग्लंड कडून घेणार होता. भारतावरसुध्दा इंग्रजांचे राज्य होते.त्यामुळे याच संधीचा फायदा घेण्याचे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी मनात ठानले व नेताजींनी हिटलर व मुसोलिनी यांच्याशी हातमिळवणी केली. १९४३ मध्ये त्यांनी जर्मनीला सोडून ते जापानला जाऊन पोहोचले.जापानचे प्रधानमंत्री जनरल हिदेकी तोजो यांनी त्यांना सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. जापानमधून सिंगापूरला गेले.वयोवृध्द क्रांतीकारी रासबिहारी बोस ह्यांनी सिंगापूर येथील “फेरर पार्कमध्ये भारतीय स्वातंत्र्य परिषदेचे नेतृत्व सुभाषबाबूंकडे सोपवीले.त्याचप्रमाणे सिंगापूर इथे कॅप्टन मोहन सिंग व्दारा स्थापित “आझाद हिंद सेनेची”कमान आपल्या हाती घेतली.भारताला स्वतंत्र करण्यासाठी आझाद हिंद सरकारची स्थापना केली.तसेच “आझाद हिंद सेना” गठीत केली.या संघाचे प्रतीक चिन्ह असलेल्या झेंड्यावर डरकाळी मारणाऱ्या वाघाचे चित्र होते.कारण नेताजींची संपूर्ण कार्यशैली वाघासारखीच होती.आझाद हिंद सेनेने १८ मार्च १९४४ रोजी भारतभूमीत प्रवेश केला व माऊडॉक येथे त्यांनी भारताचा तिरंगा फडकावला. नेताजी ४ जुलै १९४४ ला बर्मा पोहचले. तेथुनच त्यांनी भारतीयांसाठी नारा दिला ” तुम मुझे खून दो मैं तुम्हे आझादी दुंगा”.१९३९ ला गांधी विचारधारेला हरवुन नेताजींची कॉंग्रेसचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली.यावर महात्मा गांधी म्हणाले की सुभाषचंद्र बोस यांचा विजय व माझा पराजय आहे.गांधीजींच्या या वक्तव्याने व विचारांमुळे सुभाषचंद्र बोस यांचे मन दुःखावले व स्वत:हुन कॉंग्रेस सोडली. कारण महात्मा गांधी मवाळवादी तर सुभाषचंद्र बोस जहालवादी विचारांचे होते.परंतु दोघांचाही लढा भारत स्वातंत्र्यासाठीच होता.
    १९४४ मध्ये अमेरिकन पत्रकार लुई फिशर ह्यांच्याशी चर्चा करतांना महात्मा गांधींनी नेताजींना “देशभक्तांचा देशभक्त” असा उल्लेख केला होता. तर ४ जुन १९४४ ला सिंगापूरवरून एक संदेश देतांना सुभाषचंद्र बोस यांनी महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता महात्मा गांधी म्हणुन संबोधले तेव्हा पासून महात्मा गांधींना राष्ट्रपिता संबोधल्या जावु लागले.त्यामुळे महात्मा गांधींनी अहिंसेचा मार्ग अवलंबला तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी क्रांतीकारीचा मार्ग अवलंबला. दोघांचाही लढा भारत स्वातंत्र्यासाठीच होता. त्यामुळेच १५ ऑगस्ट१९४७ ला भारत स्वतंत्र झाला.१८ ऑगस्ट १९४५ ला भारतासाठी दु:खद समाचार आला नेताजी सुभाषचंद्र बोस टोकियोला जातांना तैवान येथील तैहोको जवळ हवाई दुर्घटने दरम्यान नेताजींचा मृत्यू झाला व त्यांचे स्वप्न अधुरे रहाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण देश स्तब्ध झाला. परंतु त्यांचे मृत शरीर अजुनही मिळाले नाही.म्हणुनच नेताजींच्या मृत्युच्या कारणांवर आज देखील विवाद सुरू असल्याचे दिसून येते.आजच्या राजकीय पुढाऱ्यांनी आपली वाममार्गाने कमवीलेली संपूर्ण  धनसंपत्ती देशहितासाठी स्वखुशीने खर्च केली तर ही खरी देशभक्ती ठरेल व नेताजींना खरी आदरांजली समजल्या जाईल.आजच्या युवा पिढीमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे आचार-विचार जागृत होने गरजेचे आहे.कारण देश निर्माण,देशाची प्रगती,देशाचा विकास नेताजींच्या विचारांनीच जलदगतीने पुढे जावु शकतात.त्याच बरोबर मी देशवासियांना आग्रह करेल की नेताजींच्या १२८ व्या  जयंतीचे औचित्य साधून  प्रत्येकांनी एकतरी वृक्ष लावावेत व देशात १२८ कोटी वृक्ष एकाच दिवशी लावण्याचा संकल्प सरकारनी, संघटनांनी व जनतेनी घ्यावा.यामुळे संपूर्ण भारत निसर्ग रम्य होवून प्रदूषणावर मात करण्यात आपण यशस्वी होवू.सुभाषचंद्र बोस यांच्या १२८ व्या जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम!जय हिंद!

                                                          लेखक :-  
                                                                       रमेश कृष्णराव लांजेवार                                                                                                                       मो.नं.९९२१६९०७७९,नागपूर

    β⇔ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो. 918208180510 
    (‘दिव्य भारत बीएसएम न्यूज’ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )

     

5/5 - (1 vote)

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!