





सुरगाणा तहसीलतर्फे मतदार यादी पुर्नपरीक्षणबाबत विशेष बैठक संपन्न
β⇒ दिव्य भारत बी.एस.एम. न्यूज वृत्तसेवा : प्रतिनिधी बोरगाव: लक्ष्मन बागुल
β⇒ बोरगाव ( ता सुरगाणा ) ,ता २१ ( दिव्य भारत बी.एस.एम. न्यूज वृत्तसेवा ) :– सुरगाणा तहसील कार्यालयात भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार 1-1- 24 या अहर्ता दिनांकावर आधारित मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुर्नपरीक्षण बाबत शुक्रवारी (दि.21) तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी याची बैठक प्रभारी तहसीलदार प्रशांत कुलकर्णी यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी तालुक्यातील राजकीय पक्षाचे पदाधिकारी मोहन गांगुर्डे, राजू पवार, जनार्दन भोये, सखाराम भोये, रमेश थोरात, भिका राठोड, सुभाष चौधरी उपस्थित होते.
दिव्य भारत बी.एस.एम. न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले , मो . ८२०८१८०५१०
