Breaking
ई-पेपरगुन्हेगारीदेश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

β : नाशिक :⇔ नाशिक शहरात  “कोयता गॅंग” चा पुन्हा धुमाकूळ-(प्रतिनिधी : सुरेश इंगळे)

β : नाशिक :⇔ नाशिक शहरात  "कोयता गॅंग" चा पुन्हा धुमाकूळ-(प्रतिनिधी : सुरेश इंगळे)

018501

नाशिकात  “कोयता गॅंग” चा पुन्हा धुमाकूळ

β : नाशिक :⇔ नाशिकात  "कोयता गॅंग" चा पुन्हा धुमाकूळ-(प्रतिनिधी : सुरेश इंगळे)
β : नाशिक :⇔ नाशिक शहरात   “कोयता गॅंग” चा पुन्हा धुमाकूळ-(प्रतिनिधी : सुरेश इंगळे)

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : सोमवार : दि. 15 जून  2024

β⇔नाशिक, दि.15 (प्रतिनिधी : सुरेश इंगळे ):- देवळालीकँम्प येथील हाडोळा परिसरात गेल्या पंधरा दिवसांमध्ये दोन वेळा कोयता गँग कडुन दहशत निर्माण करत, गाड्यांची तोडफोड करण्यात आली. दहशतखोर एवढ्या वरच थांबले नसून डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेला देखील त्यांनी नुकसान पोहोचविले आहे. त्यामुळे आंबेडकरी जनता संतप्त झाली असून पोलिसाकडे तक्रार करून आठ दिवस लोटले. तरी अद्यापही कारवाई झालेली नसल्यामुळे येत्या 20 जुलै रोजी रिपाई च्या वतीने पोलीस ठाण्यावर आक्रोश मोर्चा काढण्याचा इशारा रिपाई आठवले गटाचे प्रदेश सचिव डॉ.संतोष कटारे व शहराध्यक्ष सुरेश निकम यांनी दिला आहे.

                 25 जूनला दोन गटातील हाणामारीत एका गटांनी थेट हाडोळा परिसरात हातामध्ये कोयता, चोपर, काठ्या असे घातक शस्त्र घेऊन तेथील नागरिकांना धमकावले. त्यामुळे महिला वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेची तक्रार पोलिसाकडे देखील करण्यात आली होती मात्र त्याची अद्याप दखल घेतलेली नाही. परिणामी आठ जुलैला मध्यरात्रीच्या सुमारास पुन्हा हाडोळा परिसरात दहशत निर्माण करीत बारा गाड्यांची तोडफोड केलेली आहे. याबाबत परिसरात नागरिकांनी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तेथील नागरिकांची बैठक घेत,या घटनेतील संबंधित आरोपींना तातडीने अटक करण्याचे आश्वासन दिले होते.  या परिसरात सीसीटीव्ही बसवण्याबरोबरच दररोज दोन पोलिसांचा जागता पहारा राहणार असल्याचे सुद्धा सांगितले होते. परंतु अद्याप कुठलीही कारवाई झालेली नसल्यामुळे, येत्या 20 जुलैपर्यंत जर पोलिसांनी या घटनेतील सहभागी लोकांना अटक केली नाही तर रिपाई राज्यसचिव डॉ. संतोष कटारे व शहराध्यक्ष सुरेश निकम यांच्या मार्गदर्शनाखाली आक्रोश मोर्चा काढण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती शिवराज मोरे, कुंदन दोंदे , वत्सला रणशवरे, रोहित कांबळे, रेना शेख आदींनी दिला आहे.

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले :  मो. 8208180510

(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा.   ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा.दिव्य भारत बीएसएम न्यूज”)

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!