





शांतिगिरी महाराज लढणार लोकसभा निवडणूक

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : रविवार : दि, 1 फेब्रुवारी 2024
β⇔ सिन्नर, ता .1 (प्रतिनिधी : सुरेश इंगळे ) :- आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये शांतिगिरी महाराज हे नाशिक मतदार संघातून निवडणूक लढण्याचे चिन्ह आहे. त्यांची उमेदवारीसाठी विचारणा केली असता त्यांनी होकार दर्शविला असल्याचे समजते . नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये जय बाबाजी भक्त परिवाराने महाराजांना निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला आहे .
नाशिक बरोबरच छत्रपती संभाजी नगर येथूनही महाराजांच्या उमेदवारीसाठी चाचपणी केली जात आहे . नाशिक लोकसभा निवडणूक रिंगणात शांतिगिरी महाराज यांना उतरवण्याचा निर्णय आज झालेल्या जय बाबाजी भक्त परिवाराच्या बैठकीमध्ये झाल्याची माहिती भक्त परिवाराचे प्रवक्ते विष्णू महाराज यांनी दिली आहे.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ भागवत महाले : मो 8208180510