Breaking
आरोग्य व शिक्षणई-पेपरदेश-विदेशब्रेकिंगमहाराष्ट्र

β : त्र्यंबकेश्वर :⇔ त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी-(प्रतिनिधी : प्रा.समाधान गांगुर्डे)

β : त्र्यंबकेश्वर :⇔ त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी-(प्रतिनिधी : प्रा.समाधान गांगुर्डे)

018501

त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

β : त्र्यंबकेश्वर :⇔ त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी-(प्रतिनिधी : प्रा.समाधान गांगुर्डे)
β : त्र्यंबकेश्वर :⇔ त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी-(प्रतिनिधी : प्रा.समाधान गांगुर्डे)

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : मंगळवार : दि, 20 फेब्रुवारी 2024

β⇔त्र्यंबकेश्वर,दि.20 (प्रतिनिधी : प्रा.समाधान गांगुर्डे):- येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय त्र्यंबकेश्वर येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख अतिथी व्याख्याते म्हणून डॉ. रामदास भोंग उपस्थित होते. या प्रसंगी डॉ. भोंग हे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्त्री विषयक धोरण मांडताना म्हणाले की,”महाराष्ट्रातील कोणतेही कार्य हे छत्रपतींचे नाव घेतल्याशिवाय सुरू करू शकत नाही. अद्यापही राजांविषयी प्राथमिक पूर्ण माहिती वा स्त्रोत मिळवण्यास आपण असमर्थ आहोत. आजपर्यंतचा आपण ऐकत आलेला इतिहास हा बखरींवर आधारित आहे.. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या उदयास येण्यासाठी देखील छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आहे. शिवाजी महाराजांचा केवळ राजकीय इतिहासच नव्हे तर सामाजिक इतिहास देखील तितकाच महत्त्वाचा आहे. छत्रपतींचे स्त्री विषयक धोरण हे आदर्श असून स्त्री कडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन हा समानतावादी होता. स्त्रियांच्या सन्मानपूर्वक जीवनाचे ते पुरस्कर्ते होते त्यामुळे शिवराय हे जगातील एक आदर्श आहेत.”

           कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप पवार यांनी भूषविले. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात “कुळवाडीभूषण छत्रपतींच्या नावाच्या उच्चाराने व कार्याच्या दिप्तीने प्रत्येक मनात एक उत्साह आणि शक्ती संचारित होते. म्हणून युगप्रवर्तक शिवराय हे शौर्य, विचार व शक्तीचे प्रतीक ठरतात. अलौकिक कर्तृत्त्व आणि नैतिक आचरणाने प्रेरणास्रोत ठरतात. नवीन पिढी वा विद्यार्थ्यांच्या समोर इतिहास मांडताना युद्धनितीबरोबरच त्यांच्या सामाजिक, व्यवस्थापन, आरमार, वैज्ञानिक,स्त्री,शेती आदी धोरणांचा आणि त्या क्षेत्रांतील आदर्श कार्याचा इतिहास मांडायला हवा जो आजही विश्वाला अनुकरणीय आहे.”असे प्रतिपादन केले. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापनातील प्रकाश आणि ध्वनी याविषयीची उदाहरण देऊन आपले विचार व्यक्त केले.

         कार्यक्रमाचे प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख प्रा. प्रशांत रणसुरे यांनी केले.कार्यक्रमासाठी सकाळ सत्र प्रमुख डॉ. राजेश झनकर,प्रो. डॉ. संदीप निकम, प्रा.समाधान गांगुर्डे,प्रा.सांगळे,डॉ.भागवत महाले,डॉ.अजीत नगरकर,प्रा.मनोहर जोपळे,प्रा.निता पुनतांबेकर डॉ.सुलक्षणा कोळी, डॉ.विठ्ठल सोनवणे,,प्रा.ललिता सोनवणे,प्रा.विद्या जाधव, प्रा.खेडकर यांच्यासह इतर वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संदीप गोसावी यांनी केले तर आभार डॉ. दिनेश उकीर्डे यांनी मानले.

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510 

 

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!