





येवला गटविकास अधिकारी 20 हजाराची लाच घेताना रंगेहात अटक
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शनिवार : दि. 6 जून 2024
β⇔नाशिक, दि.6 (प्रतिनिधी : सुरेश इंगळे):- नासिक येथील पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मच्छिंद्रनाथ धस यांना 20000 रुपयाची लाज घेताना शुक्रवारी (दि.5) ला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. प्रांताधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून जनार्दन रहाटळ यालाही लाज घेताना पथकाने अटक केली असून एकाच दिवशी तालुक्यात दोन जणांना लाज घेताना अटक केल्यामुळे खळबळ उडाली आहे.
यापूर्वी देखील येथील पंचायत समितीत अनेक कामांचे दर ठरल्याचे चर्चा यापूर्वी होती. आजच्या कारवाईने यावर शिक्कामार्फत झाले आहे. तक्रारदाराने ग्रामपंचायत हद्दीतील वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना अंतर्गत 2022 – 23 मध्ये प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्ध करून देण्यात येत असलेल्या ग्रामपंचायतीतील वस्तीवर ठेकेदार मार्फत विकास कामे झालेले आहे. या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी धनादेशावर सही करून घेण्यासाठी मूल्यांकन बिलाचे दोन टक्के याप्रमाणे वीस हजार रुपयांची लाच गटविकास अधिकारी यांनी मागितली होती. शुक्रवारी दुपारी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने धास यांना पंचा समक्ष लाच घेताना रंगेहात पकडले. पोलीस निरीक्षक सापळा व तपास अधिकारी नीलिमा डोळस, हवालदार श्री गांगुर्डे , पोलीस नाईक संदीप हांडगे, सुरेश चव्हाण आदींनी ही कारवाई केली.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज”)