





बाऱ्हे येथे बिरसा मुंडा स्मारकाचे उदघाट्न

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : रविवार : दि, 17 मार्च 2024
β⇔सुरगाणा (ग्रामीण), दि.17 (प्रतिनिधी : पांडुरंग बिरार):- क्रांतिसूर्य बिरसा मुंडा यांच्या स्मारकाच्या अनेक दिवसापासून प्रतीक्षेत असलेल्या स्मारकाच्या बांधकामाला सुरवात करण्यासाठी उदघाट्न सरपंच वैशाली गावित यांच्या हस्ते करण्यात आले. उदघाटना प्रसंगी माजी सरपंच परसराम वार्डे,हुशार देशमुख,युवराज जाधव,रामदास जाधव, सोनवणे,हिंडे, भास्कर वार्डे, महादू जाधव, इ. उपस्थित होते.

यावेळी सदर कामाला सुरवात होणार आहे,असे बाऱ्हे ग्रामपंचायत सरपंच वैशाली गावित यांनी सांगितले. कॉ.देविदास गावित, सरपंच वैशाली गावित यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. बिरसा मुंडा स्मारकासाठी दीपक यमराज देशमुख,रामदास देशमुख यांनी विशेष प्रयत्न केले. यावेळी संजय पाडवी,जगदीश पाडवी,दौलत गुंबाडे, माणिक वार्डे, योगेश जाधव,चंद्रकांत जाधव, रुद्रीनाथ चौधरी, विलास जाधव,रेवण जाधव आदि उपस्थित होते.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510