





एस.एम. आर. के. महिला महाविद्यालयात सर डॉ. मो.स. गोसावी सरांना श्रद्धांजली
दिव्य भारत बी.एंस. एम. न्यूज : नाशिक प्रतिनिधी : प्रा छाया लोखंडे -गिरी
नाशिक, ता .१० (दिव्य भारत बी.एंस. एम. न्यूज) :- जूलै रोजी शिक्षण क्षेत्रात स्वकर्तृत्वाने एक युग निर्माण करणाऱ्या आंतरराष्ट्रीय ख्यातीचे युगकर्ते शिक्षण तज्ज्ञ सर डॉ. मो. स. गोसावी ह्यांना देवाज्ञा झाली . गोखले शिक्षण संस्थेचे महासंचालक व सचिव पदावर कार्यरत राहून सरांनी संस्थेचा खऱ्या अर्थाने विकास केला. संस्थेच्या एस. एम. आर. के. बी. के. ए. के. महिला महाविद्यालयाने आज दि. १२ जून रोजी शोक सभा आयोजित केली गेली होती. शोकसभेच्या प्रारंभी महाविद्यालयाने तयार केलेली ध्वनी- चित्रफीत दाखविली गेली. सरांचा संपूर्ण जीवन पट व त्यांना मिळालेले मान-सन्मान ह्या चित्रफितीद्वारे सर्वांसमोर मांडण्यात आले.
ह्या प्रसंगी संस्थेच्या एच. आर. डायरेक्टर आदरणीय प्राचार्या डॉ. सौ. दीप्ती देशपांडे , संस्थेचे विभागीय सचिव प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी, विश्वस्त प्रा. डॉ. आर. पी. देशपांडे , सन्माननीय देणगीदार श्री जयंतराव कुलकर्णी, श्री सुहासशेठ क्षत्रिय, उप प्राचार्या डॉ. सौ. कविता पाटील, उपप्राचार्या डॉ. सौ. नीलम बोकिल, समन्वयक प्रा. डॉ. नितीन सोनगिरकर , सरांचे पुत्र व संस्थेचे आस्थापना संचालक .श्री शैलेश गोसावी , श्री कल्पेश गोसावी , प्रकल्प संचालक व सरांचे जावई श्री प्रदीप देशपांडे ,अक्षय देशपांडे तसेच गोसावी व देशपांडे परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते. याप्रसंगी महाविद्यालयाचे निवृत्त प्राध्यापक उपस्थित होते. महाविद्यालयाच्या उपप्राचार्या व टेक्सटाईल व अपेरल डिझाइनिंग विभागाच्या प्रमुख प्रा.डॉ . सौ. कविता पाटील ह्यांनी आपल्या मनोगतात त्यांनी सरांबद्दल आपल्या आठवणींच्या माध्यमातून भावना व्यक्त केल्या. उपप्राचार्या डॉ. सौ. नीलम बोकील ह्यांनी आपल्या संदेशात सरांनी त्यांच्या जडण-घडणीत केलेले मार्गदर्शन व्यक्त केले.
श्री विक्रमभाई कपाडिया आपल्या मनोगतात सरांसारखे व्यक्तिमत्व हे आपल्या कार्याने कायम आपल्या मध्ये असते. संगीत विभागाची माजी विद्यार्थिनी विजयालक्ष्मी मणेरीकर ह्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सरांच्या संपर्कात आल्यामुळे मिळालेले अनुभवांचे अमृतकण सांगितले. महाविद्यालयाच्या माजी उप प्राचार्या डॉ सौ मनिषा राणे ह्यांनी आपले अनुभव व्यक्त केले. सरांच्या संपर्कात येऊन माझ्या आयुष्याला परीस स्पर्श झाला असे त्या म्हणाल्या. माजी उपप्राचार्या डॉ मोहिनी पेटकर हयांनी सरांमधील संवेदनशील माणसाचे रूप उलगडून दाखविले. सरांनी संस्थेचा केवळ संख्यात्माकच नाही, तर गुणात्मक विकास केला. माजी उपप्राचार्या साधना देशमुख ह्यांनी ह्या समयी आपल्या भावना व्यक्त केल्या. नोकरीच्या प्रारंभीच्या काळात सरांनी दिलेला आत्मविश्वास व त्यामुळे पुढची वाटचाल किती सुकर झाली हे सांगितले.
महाविद्यालयाच्या विविध कार्यात सरांचा मिळालेला पाठिंबा त्यांनी सांगितला. महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक व रसायन शास्त्र विभाग प्रमुख प्रा. श्री. जयंत भातांब्रेकर ह्यांनी सरांबद्दल आपले ऋण व्यक्त केले. त्यांनी आपल्या मनोगतात सरांचा वेळेचा सदुपयोग करण्याची त्यांची वृत्ती , अथक काम करण्याचा त्यांचा गुण व अध्यात्माचा व्यासंग व्यक्त केला. महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाचे समन्वयक प्रा. डॉ. नितीन सोनगिरकर ह्यांनी सरांच्या जाण्याने आलेली पोरकेपणाची भावना व्यक्त केली. सरांच्या सहवासात ज्ञान, आपुलकी, मार्गदर्शन सर्व काही मिळत असे ते म्हणाले. मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. विवेक खरे ह्यांनी आपल्या मनोगतात सरांचे संस्थेतील सर्व कर्मचार्यांशी वागणे किती आपुलकीचे होते हे सांगितले. व्यावसायिक पाठ्यक्रमाच्या समन्वयक सौ. मैथिली लाखे ह्यांनी आपल्या मनोगतात सरांकडून मिळालेले प्रोत्साहन स्पष्ट केले. शिक्षकी पेशाबद्दल सरांनी एक महत्वाचा दृष्टीकोन त्यांनी दिला असे त्या म्हणाल्या. कनिष्ठ महाविद्यालयाच्यावतीने मराठी विभागाच्या अध्यापिका सौ. छाया लोखंडे – गिरी यांनी सरांना आदरांजली वाहिली. सरांच्या आठवणींना उजाळा दिला. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्यावतीने महाविद्यालयाचे रोखपाल श्री प्रशांत आंबेकर ह्यांनी श्रद्धांजली वाहिली. केंद्रीय समन्वय समितीचे समन्वयक श्री शिरीष दडके नाशिक रोड महाविद्यालयाच्या प्राचार्या मृणाल देशपांडे यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले व श्रद्धांजली अर्पित केली. संस्थेच्या नाशिक विभागाचे सचिव प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की आदरणीय गोसावी सर हे इतरांना प्रेरित करणारे महान शिक्षक होते. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनाखाली संस्थेने खूप मोठे कार्य केले आहे. सर्वांसमोर . कर्मचाऱ्यांच्या चांगल्या कामाचे कौतुक करावे व एकट्या व्यक्तीला त्याच्या चुका समजावून सांगाव्यात अशी शिकवण त्यांनी दिली असे ते म्हणाले. गोखले शिक्षण संस्थेच्या मानव संसाधन संचालिका प्राचार्या डॉ. सौ. दीप्ती देशपांडे ह्यांनी सरांना श्रद्धांजली अर्पित केली. सरांकडून मिळालेल्या वैचारिक वारशाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. सरांनी सुरु केलेले प्रकल्प पूर्ण करणे हीच खरी सरांना श्रद्धांजली आहे, त्यांनी माणुसकीची कास कधी सोडली नाही. असे त्या म्हणाल्या. शोकसभेचे अध्यक्ष संस्थेचे विश्वस्त प्राचार्य डॉ. आर. पी. देशपांडे ह्यांनी आपल्या भाषणात सरांबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. सरांकडून खूप चांगल्या गोष्टी शिकण्यास मिळाल्या. शिक्षण क्षेत्राची निवड करून त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य त्यासाठी समर्पित केले. संस्था कायम आपल्या ऋणात राहील, असे ते म्हणाले. या शोकसभेला महाविद्यालयातील शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थानी मोठ्या संख्येने उपस्थित होते . मंत्र पठणाने शोक सभेची सांगता झाली .
दिव्य भारत बी.एंस. एम. न्यूज : मुख्य संपादक : प्रा डॉ भागवत महाले, मो.८२०८१८०५१०
