





शिवराज्याभिषेकाच्या 350 व्या वर्षपूर्ती निमित्त जयरामभाई हायस्कूलमध्ये तीन दिवसीय चित्रप्रदर्शन

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार : दि, 9 ऑगस्ट 2024
β⇔ नाशिकरोड, दि.9 (प्रतिनिधी : संजय परमसागर):- ” ६ जून १६७४ रोजी शहाजीराजांच्या पुत्राने म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचे राज्य अधिकृत व्हावे आणि स्वतःला त्या राज्याचे अधिकृत राजे व्हावे. या हेतूने स्वतःचा राज्याभिषेक करविला असा शिवराज्याभिषेक सोहळ्यास ३५० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल जे चित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. शिवरायांचे कार्य व तसेच गड किल्ले याचा अभ्यास विद्यार्थ्यांनी करून त्यातून शोध व बोध घ्यावा, ” असे जयरामभाई हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री. जे. एन. आहेर यांनी केले.
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या नाशिकरोड येथील जयरामभाई हायस्कूल येथे माजी शिक्षक चित्रकार श्री रमेश जाधव यांचे शिवचरित्रावर व शिवराज्याभिषेक सोहळा तसेच गडकिल्ल्यांचा अभ्यास या विषयावर ३ दिवसीय चित्रप्रदर्शन भरवले आहे. त्या निमित्ताने उपस्थित शिक्षक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
याप्रसंगी शाळा अधीक्षक योगेश महाजन, तुषार खांडबहाले व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. या प्रदर्शनात एकूण १३० शिवचरित्र व गड किल्ल्यांवर आधारित चित्रे प्रदर्शित करण्यात आली आहेत. प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाचा लाभ घेतला.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )