Breaking
कृषीवार्ताक्रिडा व मनोरंजनगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्रराजकिय

β : नाशिक : ⇔ कला गुण, ज्ञानाचा उपयोग करून  सामर्थ्यवान , संवाद – संभाषण कौशल्य विकसित करा-  डॉ. सौ. दीप्ती देशपांडे-( प्रतिनिधी : संजय परमसागर )

β : नाशिक : ⇔ कला गुण, ज्ञानाचा उपयोग करून  सामर्थ्यवान , संवाद - संभाषण कौशल्य विकसित करा-  डॉ. सौ. दीप्ती देशपांडे-( प्रतिनिधी : संजय परमसागर )

018501

कला गुण, ज्ञानाचा उपयोग करून  सामर्थ्यवान , संवाद – संभाषण कौशल्य विकसित करा डॉ. सौ. दीप्ती देशपांडे

β : नाशिक : ⇔ कला गुण, ज्ञानाचा उपयोग करून  सामर्थ्यवान , संवाद - संभाषण कौशल्य विकसित करा-  डॉ. सौ. दीप्ती देशपांडे-( प्रतिनिधी : संजय परमसागर )
β : नाशिक : ⇔ कला गुण, ज्ञानाचा उपयोग करून  सामर्थ्यवान , संवाद – संभाषण कौशल्य विकसित करा-  डॉ. सौ. दीप्ती देशपांडे-( प्रतिनिधी : संजय परमसागर )

β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार  : दि. 1 डिसेंबर 2023 
β⇔नाशिक,  ता 1  ( प्रतिनिधी : संजय परमसागर ) : – ” २०१५ पासून सुरू झालेल्या आय गेन स्पर्धेतील सहभाग अनेकांना प्रेरणादायी असून विद्यार्थी दशेतूनच उद्याचे कलाकार निर्माण होतील, यातून नेतृत्व कौशल्य प्राप्त करता येईल. आपल्यातील कलागुणांचा व मिळणाऱ्या ज्ञानाचा प्रकाश इतरांसाठी उपयोगी करून संवाद , संभाषण कौशल्य विकसित करा, ” असे गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सचिव व खजिनदार डॉ.सौ. दीप्ती देशपांडे यांनी केले.
                  गोखले एज्युकेशन सोसायटीच्या केंद्रीय समन्वय समितीतर्फे आयोजित आय-गेन स्पर्धांची अंतिम फेरी दिनांक ०१ डिसेंबर रोजी संस्थेच्या बीवाय के महाविद्यालयातील ढेकणे सभागृहात अत्यंत उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाली. उद्घाटन सत्राच्या कार्यक्रमात अध्यक्षीय मार्गदर्शन करताना डॉ. देशपांडे बोलत होत्या . याप्रसंगी व्यासपीठावर दै . लोकनामाचे संपादक प्रा. जयंत महाजन हे होते . केंद्रीय समन्वय समितीच्या अध्यक्षा डॉ. सौ. अंजली कुलकर्णी , सहसचिव डॉ.आर. पी. देशपांडे, विभागीय सचिव प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देऊन त्यातून त्यांचा व्यक्तिमत्व विकास घडविणे हा या स्पर्धांचा मूळ उद्देश आहे. या अंतिम फेरीसाठी संस्थेच्या नाशिक, पालघर व मुंबई विभागातील विविध शाळा व महाविद्यालयातील एकूण १८० स्पर्धक सहभागी झाले होते . कार्यक्रमाचे प्रस्तावि डॉ. अंजली कुलकर्णी यांनी केले .
              विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे जयंत महाजन यांनी,’ गुरूंप्रती निष्ठा प्रत्येकाने बाळगावी, प्रत्येक स्पर्धेत हिरीरीने सहभागी घेऊन आवडत्या क्षेत्रात करियर करा, आज जगातील संदर्भ बदलत आहेत, जगाचा अभ्यास करा, संधी शोधा व संधीचे रूपांतर सोन्यात करा , ‘ असे सांगून त्यांनी आपला पत्रकारितेचा जीवनप्रवास रंजकपणे मांडला. स्पर्धांच्या पारितोषिक वितरण समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिका डॉ. वृंदा भार्गवे उपस्थित होत्या . स्पर्धकांशी संवाद साधतांना त्यांनी शिक्षणातून नैतिक मुल्यांची रुजवण झाली पाहिजे. तुमच्या आतला माणूस जागा करा, गरजवंताला मदत करा मुखातून सभ्य भाषा असू द्या सुसंस्कृत व आज मी चांगलं काय केलं हे स्वतःला विचारा,भौतिक सुख-समृद्धीपेक्षाही माणूस घडविणे ही आजच्या काळाची गरज आहे सांगितले. याप्रसंगी समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे विश्वस्त डॉ. आर. पी. देशपांडे होते. केंद्रीय समन्वय समितीचे समन्वयक शिरीष दडके यांनी मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक केले.
             याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे नाशिक विभागीय सचिव प्राचार्य डॉ. राम कुलकर्णी, बीवायके महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही. एन. सूर्यवंशी, उपप्राचार्य सुहासिनी जाधव,शालेय स्पर्धांचे समन्वयक विनोद देशपांडे आदी उपस्थित होते. समारोप सत्रातील अध्यक्षीय मार्गदर्शन करताना डॉ. आर. पी. देशपांडे यांनी आय गेन स्पर्धेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी व्यक्तिमत्व घडवून आपले कौशल्य सिद्ध करत आहेत. ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांमध्ये संस्कृती व विचारांचे आदान प्रदान याद्वारे होते.पुस्तके वाचन करा . त्यातून सकारात्मक विचाराने आत्मविश्वास निर्माण करा, मोबाईलचा कमीत कमी वापर करा असे सांगितले.

β : नाशिक : ⇔ कला गुण, ज्ञानाचा उपयोग करून  सामर्थ्यवान , संवाद - संभाषण कौशल्य विकसित करा-  डॉ. सौ. दीप्ती देशपांडे-( प्रतिनिधी : संजय परमसागर )
β : नाशिक : ⇔ कला गुण, ज्ञानाचा उपयोग करून  सामर्थ्यवान , संवाद – संभाषण कौशल्य विकसित करा-  डॉ. सौ. दीप्ती देशपांडे-( प्रतिनिधी : संजय परमसागर )

            गीतगायन, वत्कृत्व, काव्यवाचन, एकपात्री अभिनय, चित्रकला, निबंध या स्पर्धांमध्ये नाशिक, मुंबई, पालघर या तिनही विभागातील शालेय, कनिष्ठ महाविद्यालयातून प्राथमिक व उपांत्य फेरीतून निवडलेले सर्वोत्कृष्ट १८० स्पर्धक सहभागी झाले होते. कनिष्ठ महाविद्यालयीन  स्पर्धांसाठी परीक्षक म्हणून संजय पुणतांबेकर व  श्री.मोहन उपासनी यांनी गीतगायन स्पर्धेचे व तसेच वत्कृत्व स्पर्धांसाठी सुहासिनी तपस्वी व उज्ज्वला कुलकर्णी तर निशा सरदेशमुख, डॉ.मोहिनी पेटकर यांनी काव्यवाचन तर कलाकार आदिती मोराणकर, कुंतक गायधनी यांनी एकपात्री अभिनय स्पर्धेसाठी परीक्षण केले . शालेय विभागासाठी श्रीमती सीमा भार्गव , नीलिमा कुलकर्णी, डॉ. लक्ष्मीकांत भट, डॉ. उत्तम करमाळकर, अमृता जाधव, ओमकार वैरागकर, चारुदत्त दीक्षित मनीषा इनामदार, रश्मी नाईक, जे. एन. खैरनार, द्विप आहेर यांनी स्पर्धेचे परीक्षण केले.
             या सोहळ्यास विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी स्पर्धक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. रसिका सप्रे, प्रा. स्नेहा रत्नपारखी यांनी केले. तर उद्घाटन सत्राचे आभार प्रा.शिरीष दडके यांनी तर समारोप सत्राचे आभार विनोद देशपांडे यांनी मानले.
           याप्रसंगी शालेय स्तराच्या बक्षिसाचे वाचन वैशाली महाजन तर कनिष्ठ महाविद्याल स्तरावरील बक्षिसांचे वाचन शोभा त्रिभुवन यांनी केले. विद्यार्थ्यांमधून प्रचिती अहिरराव व अनन्या मोरे यांनी प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त केले. विजेत्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते चषक व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने झाला.             
या स्पर्धांचा निकाल खालीलप्रमाणे- शालेय गट (इयत्ता ५ वी ते ७ वी)  निबंध स्पर्धा     मनस्वी महेश वंजारा  –पिसिजी हायस्कूल बोर्डी   – प्रथम ,    मयुरी बाळू कोष्टी  – माधवराव लेले विद्यालय, नाशिक- द्वितीय  काव्यवाचन स्पर्धा
  सदिच्छा संदीप शिंदे – माधवराव लेले विद्यालय, नाशिक– प्रथम     मयुरी नितीन धर्माधिकारी – खारघर हायस्कूल खारघर– – द्वितीय
वत्कृत्व स्पर्धा  शुभ्रा शशिकांत लोटलीकर – आर. एम. भट. हायस्कूल परळ – प्रथम  ,   साई सुदाम धुमाळ  – प्राथमिक आणि माध्यमिक हायस्कूल पिंपळगाव- द्वितीय  , शालेय गट (इयत्ता ८ वी ते १० वी) , निबंध स्पर्धा , )  समिधा नरेश महाडिक  – आर्यन भट हायस्कूल, परळ – प्रथम  )   पूर्वा अतुल कुलकर्णी– प्राथमिक आणि माध्यमिक हायस्कूल पिंपळगाव – द्वितीय  वत्कृत्व स्पर्धा  )   अनन्या रवींद्र मोरे  –एच ए एल हायस्कुल, ओझर – प्रथम )   आयुष महेश माने – आर एम भट हायस्कूल.परळ – द्वितीय  गीतगायन स्पर्धा  ) श्लोक प्रभाकर बोडके – पी सी जी हायस्कूल, बोर्डी – प्रथम  )    धन्वी दिलीप बोर्डीवाला– जयराम भाई हायस्कूल, नाशिक रोड – द्वितीय
कनिष्ठ महाविद्यालय  गट  काव्यवाचन स्पर्धा )   अनुष्का विजय गुप्ता   –एच पी टी महाविद्यालय, नाशिक – प्रथम )   श्रीहरी सुदर्शन जोशी–एच पी टी महाविद्यालय, नाशिक – द्वितीय  वत्कृत्व स्पर्धा )    हर्षदा पांडुरंग घोंगे – सेठ के व्ही पारेख महाविद्यालय, बोरिवली   – प्रथम  )     श्रेया विनोद चिनावलकर– एचपीटी महाविद्यालय, नाशिक  – द्वितीय एकपात्री अभिनय स्पर्धा )    युगा मिलिंद कुलकर्णी – एच.पी.टी. महाविद्यालय, नाशिक  – प्रथम )   साक्षी रमेश जाधव  –एच ए एल महाविद्यालय, ओझर- द्वितीय  गीतगायन स्पर्धा )   आर्या कापुरे – एस एम आर के महाविद्यालय, नाशिक– प्रथम )    जान्हवी विवेक दहिवलकर   –सेठ के व्ही. पारेख महाविद्यालय, बोरीवली- द्वितीय या स्पर्धांचा निकाल जाहीर करण्यात आला .

β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज :मुख्य संपादक :डॉ भागवत महाले : मो. ८२०८१८०५१० 

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा

DivyaBharat

सर्व सामान्य माणसांच्या न्याय्य हक्कासाठी ! एकमेव निर्भीड वृत्तपत्र

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
Don`t copy text!