β : नाशिक:⇔ 2 ऑगस्टला नाशिक येथे नीती आयोग समितीची बैठक-(प्रतिनिधी : सुरेश इंगळे)
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शुक्रवार : दि, 26 मे 2024
β⇔नाशिक, दि. 26(प्रतिनिधी : सुरेश इंगळे):-नीती आयोगाच्या पश्चिम विभागीय समितीची बैठक 2 ऑगस्ट रोजी नाशिक येथे होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतील. बैठकीत सचिव स्तरावरील सुमारे 80 अधिकारी उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रीय स्तरावरील अशा स्वरूपाची बैठक नाशिकमध्ये होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
अमित शहा यांनी या बैठकीत राज्यांना सशक्त करण्यासाठी आणि केंद्र व राज्यांमधील धोरणात्मक आराखड्यांची अधिक चांगली समज वाढविण्यासाठी सहकारी संघराज्यावर भर देणार आहेत. तंटे सोडविण्यासाठी आणि सहकारी संघराज्यांना चालना देण्यासाठी त्यांनी या झोनल कौन्सिलच्या बैठकीचे आयोजन केले आहे. बैठकीत जवळपास 80 मुख्य सचिव, प्रधान सचिव उपस्थित राहतील. विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम आणि जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ हे बैठकीचे सूक्ष्म नियोजन करणार आहेत.
या बैठकीला मुख्यमंत्री, मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि राज्य व केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. महिला व बालकांवरील लैंगिक गुन्ह्यांचा आणि बलात्काराच्या प्रकरणांचा जलद तपास, बलात्कार आणि पांक्सो कायद्यांतील खटल्यांचा निपटारा करण्यासाठी जलद गती विशेष न्यायालयाच्या योजनेची अंमलबजावणी आणि सर्वसामान्यांच्या समस्यांवर चर्चा होईल. रस्ते जोडणी, वीज उद्योग, बँक सुविधा, पोषण अभियानाद्वारे कुपोषण दूर करणे, शाळेतील मुलांचे गळतीचे प्रमाण कमी करणे, आयुष्यमान भारत आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत सरकारी रुग्णालयाचा सहभाग यावरही चर्चा होईल.
β⇔दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )
🅱️: येडशी(धाराशिव):⇔येडशी जनता विद्यालय बारावी निकालाची उज्वल परंपरा कायम-(प्रतिनिधी-सुभान शेख)
2 weeks ago
🅱️ : पुणे :⇔ प्रा. डॉ. सोमनाथ वाघमारे यांना ‘झुलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया’चे सीनियर सायंटिस्ट गोल्ड मेडल पुरस्कार प्रदान-(प्रतिनिधी-डॉ. भागवत महाले)
3 weeks ago
🅱️: नाशिकरोड:⇔बिटको महाविद्यालयात महाराष्ट्र दिन उत्सहात संपन्न-(प्रतिनिधी-संजय परमसागर)
3 weeks ago
🅱️:येडशी(धाराशिव):⇔धाराशिव गटविकास अधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघनप्रश्नी; श्रीमती.डांगे.पी.एम ग्रामपंचायत अधिकाऱ्याविरुद्ध प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी-(प्रतिनिधी-सुभान शेख)
4 weeks ago
🅱️ : सुरगाणा(नाशिक):⇔”सामुदायिक विवाह हि काळाची गरज”-नरहरी झिरवाळ होय मी आदिवासी विकास मंत्री नव्हे, मात्र आदिवासी आहे, हे निश्चित-अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ-(प्रतिनिधी-रतन चौधरी)
4 weeks ago
🅱️:सायखेडा(नाशिक):⇔”शिक्षकांनी ज्ञानदानाबरोबर विद्यार्थी घडविण्याचे पवित्र कार्य करावे-सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे”-प्रतिनिधी-राजेंद्र कदम)
4 weeks ago
🅱️⇔नाशिक(शहर):⇔”गोखले एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आयोजित पद्मविभूषण श्री.रतन टाटा स्मृती व्याख्यान संपन्न”-(प्रतिनिधी-छाया लोखंडे)