





येडशी विद्युत महावितरणाने बातमीची दखल घेत पाच दिवसात वीजपुरवठा सुरळीत ;नागरिकांत समाधान ! “दिव्य भारत बीएसएम न्यूज चॅनल” च्या बातमीचा दणका

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : गुरुवार : दि. 11 जून 2024
β⇔येडशी (धाराशिव ), दि.11(प्रतिनिधी : सुभान शेख ):- उस्मानाबाद तालुक्यातील येडशी येथील बलवंड गल्लीत अंगणवाडी जवळील डीपीची केबल जळाल्याने अनेक दिवसापासून नागरीक त्रास झाले होते. त्यामुळे शेतकरी , विद्यार्थी व नागरिकांना विजेचा अभावी त्रास सहन करावा लागत होता.
बलवंड गल्लीतील या अंगणवाडी डीपीचे केबल जळालेले पाहून यूट्यूब चैनलचे येडशी प्रतिनिधी सुभान शेख यांनी अंगणवाडी डीपीकडे धाव घेतली आणि जळालेले केबल पाहून शहानिशा केली. जळालेले केबलमुळे नागरिकांचे विजे अभावी हाल होत आहेत म्हणून नागरिकांच्या सुविधेसाठी सविस्तर वृत्त दि.४जुलै रोजी “दिव्य भारत बीएसएम न्यूज चॅनल” व ” दिव्य भारत बीएसएम यु ट्युब चॅनल” ला सदर बातमी ही ” येडशीत विद्युत महावितरणाचा भोंगळ कारभार ; नागरिकांच्या जीवाशी खेळ, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष” या शीर्षकाने अशी बातमी यूट्यूब चॅनलचे ‘दिव्य भारत बीएसएम न्यूज’ चॅनलचे मुख्य संपादक – डॉ. भागवत महाले यांच्या यु ट्युब चॅनलला प्रकाशित करण्यात आली होती.
येडशी शहरातील नागरिकांनी सदर बातमी प्रसिद्ध झाल्याने समाधान व्यक्त केले होते . सदर बातमीचे गांभीरे लक्षात घेता येडशी महावितरणचे सहाय्यक अभियंता – चव्हाण यांनी दखल घेऊन नवीन केबल वरिष्ठ पातळीवरून मागणी करून आज दि.११ जुलै रोजी चार लाईनमन कर्मचारची टीम तयार करून नवीन केबल सोबत घेऊन अंगणवाडी जवळील डीपीकडे धाव घेत कामाला सुरवात केली. यावेळी लाईनमन – परमेश्वर मिसाळ यांनी डिपीवर चढून डिपीचे नवीन केबल बदलण्याचे काम तीन तासात पूर्ण केले. अंगणवाडी जवळील डीपीचे काम लाईनमन – परमेश्वर मिसाळ, मंगेश क्षिरसागर, सोनु कोल्हापूरे, शहाजी शिंदे या चार लाईनमन कर्मचाऱ्यांनी व्यवस्थित कामगिरी बजावली. लाईनमनने अंगणवाडी डीपीचे नुतन केबल बदलल्यामुळे सर्व नागरिकांच्या चेहऱ्यावर हसू उमटले आणि आनंद झाला. विजे अभावी नागरिकांना, विद्यार्थ्यांना फटका बसत होता , मात्र हे काम बरेच दिवसांनी पूर्ण झाल्यानंतर सर्व लाईनमन , सहाय्यक अभियंता – चव्हाण , तेरचे सहाय्यक उपअभियंता – स्वामी , विद्युत महावितरणाचे वरिष्ठ अधिकारी , दिव्य भारत बीएसएम न्यूज पोर्टल व यु ट्युब चॅनल सर्वांचे आभार व्यक्त केले.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज”)