





एस.एम.आर. के. महिला महाविद्यालयात मराठी वाङ्गय मंडळाचे उद्घाटन संपन्न

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : शनिवार : दि, 17 ऑगस्ट 2024
β⇔नाशिक (शहर), दि.17 (प्रतिनिधी : छाया लोखंडे ):- महाराष्ट्रात राहणारे आपण सर्वजण भाग्यवान आहोत, कारण आपली मातृभाषा अर्थात मराठी भाषेचे सौंदर्य सगळ्यात जास्त भावणारे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यव्यवहार कोशाची निर्मिती केली तर कवी मोरोपंतांच्या आगळ्यावेगळ्या लेखनशैलीतून मराठी वाक्यात कशी मोलाची भर पडली आहे. याविषयीची विविध उदाहरणे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या खेडेकर यांनी अध्यक्षीय मनोगतात दिली, वाश्य मंडळाच्या उपक्रमांची कशी आवश्यकता आहे, सावरकरांनी मराठी भाषेला दिनांक सारखे विविध शब्द दिले, अशा असंख्य नव्या शब्दांच्या बरोबरीने आपल्या भाषेने इतरही भाषेतील शब्द सहजतेने स्वीकारले त्यामुळे मराठी भाषा आणि त्यातील वाक्य कसे समृद्ध होत गेले याविषयी त्या बोलत होत्या.
एस.एम.आर.के. महिला महाविद्यालयातील मराठी विभागातर्फे शनिवार दि. १० ऑगस्ट २०२४ रोजी मराठी वाक्य मंडळाचे उद्घाटन विविध साहित्यिकांच्च्या रचना असलेल्या भित्तीफलकाचे अनावरण करीत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संध्या खेडेकर यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी विद्यार्थिनींना एक लघुचित्रपट दाखविण्यात आला व त्यावर विद्यार्थिनी संवाद घडविण्यात आला. कला शाखा समन्वयक व संगीत विभागप्रमुख डॉ. अविराज तायडे यांनी डॉ. संध्या खेडेकर यांचा ग्रंथभेट व रोप देऊन सत्कार केला. महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. गौतमी वाघ हिने ईशस्तवन सादर केले. मान्यवरांचा परिचय सौ. सविता देसले हिने करून दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत मराठी विभागाच्या प्राध्यापक डॉ. सायली आचार्य यांनी केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. केतकी नगरकर, कु. मोहिनी गंधे यांनी केले तर आभार कु. ईशू यादव हिने मानले. याप्रसंगी समन्वयक डॉ. अविराज तायडे, उपप्राचार्य डॉ. नितीन सोनगीरकर, तसेच प्रा. छाया लोखंडे – गिरी, डॉ. सुरेश कानडे, डॉ. सतीश धनवडे, प्रा. मनिषा जोशी, डॉ. संगीता कांबळे यांच्यासह विविध विभागप्रमुख, प्राध्यापक वृंद आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510
(‘दिव्य भारत बीएसएम न्यूज‘ची बातमी शेअर व लाईक करा आणि सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटणवर प्रेस करा. ताज्या बातम्या व घडामोडी नियमित बघत राहा. “दिव्य भारत बीएसएम न्यूज” )