सिडको विभागात राष्ट्रवादीचे दोन आकडीनगरसेवकनिवडून आणणार ! – विक्रांत डहाळे
β⇒दिव्य भारत बी एस एम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : रविवार : दि 18 सप्टेंबर 2023
β⇒नवीन नाशिक, ता18 ( प्रतिनिधी: प्रा डॉ . कृष्णा शहाणे ) – “सिडको बहुसंख्य कामगार वस्तीत आज तागायत न झालेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन आकडी नगरसेवक निवडून आणणार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवार यांचे विचार पुढे नेणार” असा आत्मविश्वास राष्ट्रवादी युवक काँग्रेस सिडकोचे नवनियुक्त विभागीय अध्यक्ष विक्रांत डहाळे यांनी व्यक्त केला. नवीन नाशिक मथुरा गार्डन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मेळावा व पदग्रहण सोहळा शहर अध्यक्ष गजानन नाना शेलार यांचे मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबूब भाई शेख यांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात पार पडला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष पुरुषोत्तम कडलग हे होते. मेळाव्यामध्ये नवीन नाशिक राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्षपदी विक्रांत डहाळे यांना सर्वानुमते मेहबूब भाई शेख यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले आणि त्यांच्या शेकडो सहकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
सदर कार्यक्रमाचे आयोजन विभाग अध्यक्ष विजय मटाले, नवीन नाशिक कार्याध्यक्ष कृष्णा मामा काळे यांच्या समवेत सर्व सहकाऱ्यांनी मिळून केले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, शादाब सय्यद, शहर सरचिटणीस मुन्नाभाई अन्सारी, गोकुळ शेठ पिंगळे,युवक शहराध्यक्ष बाळा निगळ, महिला शहराध्यक्ष अनिता दामले, पश्चिम विधानसभा अध्यक्ष धनंजय राहणे, सातपूर विभाग अध्यक्ष प्रवीण नागरे, युवक अध्यक्ष अभिमन्यू गुडघे पाटील, दर्शन जुन्नरे, आश्विन रोकडे, सुनील घुगे, किरण शिंदे, विशाल बबलू पगार,आनंद पाल, करण अरोटे, विकास अहिरे, शाहू वाघ, सोनू कमोद, सागर ठाकरे, यश बागुल, शौर्य बिरारी, अमोल कदम, निलेश शहाणे, सुशांत डहाळे, बबलू कदम, प्रणव नेरकर आदी उपस्थित होते.
β⇒ दिव्य भारत बी एस एम न्यूज : मुख्य संपादक : डॉ . भागवत महाले : मो . ८२०८१८०५१०
मुख्य संपादक- डॉ. भागवत महाले -दिव्य भारत बी.एस. एम. न्यूज
🅱️: येडशी(धाराशिव):⇔येडशी जनता विद्यालय बारावी निकालाची उज्वल परंपरा कायम-(प्रतिनिधी-सुभान शेख)
2 weeks ago
🅱️ : पुणे :⇔ प्रा. डॉ. सोमनाथ वाघमारे यांना ‘झुलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया’चे सीनियर सायंटिस्ट गोल्ड मेडल पुरस्कार प्रदान-(प्रतिनिधी-डॉ. भागवत महाले)
3 weeks ago
🅱️: नाशिकरोड:⇔बिटको महाविद्यालयात महाराष्ट्र दिन उत्सहात संपन्न-(प्रतिनिधी-संजय परमसागर)
3 weeks ago
🅱️:येडशी(धाराशिव):⇔धाराशिव गटविकास अधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघनप्रश्नी; श्रीमती.डांगे.पी.एम ग्रामपंचायत अधिकाऱ्याविरुद्ध प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी-(प्रतिनिधी-सुभान शेख)
4 weeks ago
🅱️ : सुरगाणा(नाशिक):⇔”सामुदायिक विवाह हि काळाची गरज”-नरहरी झिरवाळ होय मी आदिवासी विकास मंत्री नव्हे, मात्र आदिवासी आहे, हे निश्चित-अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ-(प्रतिनिधी-रतन चौधरी)
4 weeks ago
🅱️:सायखेडा(नाशिक):⇔”शिक्षकांनी ज्ञानदानाबरोबर विद्यार्थी घडविण्याचे पवित्र कार्य करावे-सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे”-प्रतिनिधी-राजेंद्र कदम)
4 weeks ago
🅱️⇔नाशिक(शहर):⇔”गोखले एज्युकेशन सोसायटीच्या वतीने आयोजित पद्मविभूषण श्री.रतन टाटा स्मृती व्याख्यान संपन्न”-(प्रतिनिधी-छाया लोखंडे)