





उळुशपेढी येथील दिंडीचे मोधळपाडा गावात उत्साहात स्वागत

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : गुरुवार : दि.1 फेब्रुवारी, 2024
β⇔सुरगाणा (ग्रामीण), दि.1 (प्रतिनिधी : पांडुरंग बिरार) :- उळुशपेढी (गुजरात) धरमपुर तालुक्यातील उळुशपेढी या गावातील भाविक श्री क्षेत्र त्रेंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ निवॄतीनाथ महाराज यात्रेनिमीत जाणा-या दिंडीचे सुरगाणा तालुक्यातील मोधळपाडा गावात मोठया उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी महिलानी व पुरुषानी पारंपरिक नॄत्त्य व भजन गायले या दिंडीचे मंगळवारी बेडसे गावी मुकाम केला होता. बुधवारी दुपारचे जेवन मोधळपाडा गावामध्ये केले. संध्याकाळीचा मुकाम पेठ तालुक्यातील माननारे गाव शिवसेत आंबे,तर गुरुवावारी दुफारच जेवन जोगमोडी यागावी आहे. ठीकठीकांनी मुकाम घेत १२ दिवस चालत जाणार आहेत. सदर दिंडी ५ फेब्रुवारीला त्रेंबकेश्वर येथे पोहोचाणार आहे. दिंडीचे चालक म्हणून हौसराज शिंगाडे महाराज सरमाळ हे आहेत. १० दिवस प्रवास करत ही दिंडी त्र्यंबकेश्वरला पोहोचणार आहे . तरी हया रस्तामध्ये मोधळपाडा गावामध्ये स्वागत करताना गावकरी मंडळी कंसराज गावित, दत्तु जाधव, वंसत गावंडे, नरेंद्र गावंडे, एकनाथ मोरे, सुरेश भोये वंसत जाधव, दत्तु गवळी, हौसराज भोये, अनिल गायकवाड़, आनंदा जाधव, यशवंत भोये असा उत्साहात नामाच्या गजरात नाचत गावच्या पुरुषानी व महिलानी स्वागत केले.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज :मुख्य संपादक : डॉ भागवत महाले: मो.८२०८१८०५१०