





श्री. एकवीरा देवी माध्यमिक विद्यालय देवपूर एसएससी बोर्ड परीक्षेचा निकाल शेकडा 95 टक्के
दिव्य भारत बी.एस एम. न्यूज :प्रतिनिधी धुळे : भागवत सोनवणे
धुळे, ता .९ ( दिव्य भारत बी.एस एम. न्यूज ) : – येथील श्री. एकवीरा देवी शैक्षणिक मंडळ संचलित , श्री. एकवीरा देवी माध्यमिक विद्यालय देवपूर (धुळे ) विद्यालयाचा एसएससी बोर्ड परीक्षेचा निकाल 95 टक्के लागला आहे . सदर परीक्षेत विद्यालयातून विशेष प्राविण्यात 33 विद्यार्थी ,प्रथम श्रेणी 52 विद्यार्थी ,द्वितीय श्रेणी 43 विद्यार्थी उत्तीर्ण झाले . विद्यालयात प्रथम क्रमांक कुमारी दीक्षा संजय लांबोळे -शे.गूण 88.०० %, द्वितीय कुमारी रुचिका दिलीप पाटील -शे. गुण 87.80% तृतीय चि. राहुल रवींद्र तलवारे- शे.गुण 87.7% तृतीय क्रमांक कुमारी साक्षी दगडू कोडी -शे गुण 87.7% चतुर्थ चि. हार्दिक नवनीत मोरे शेकडा गुण 87.40% पाचवा चि . समीर शब्बीर पिंजारी -शे.गुण 87.०० %, चि . सिद्धेश तुळशीराम शिंपी-शे.गुण 85.80% आदि गुण प्राप्त केले आहेत . या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन माननीय श्री प्रशांत वाघ यांनी पुष्पगुच्छ देऊन गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार केला . यावेळी सचिव माननीय श्री .प्रदीपची वाघ ,विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती एम एल.मोरे, पर्यवेक्षिका सौ. पी आर ,अहिरराव विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
(दिव्य भारत बी.एस. एम. न्यूज : मुख्य संपादक – डॉ. भागवत महाले मो . ८२०८१८० ५१० )