





एकविरा देवी माध्यमिक विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी

β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज वृत्तसेवा : नाशिक : मंगळवार : दि, 16 एप्रिल 2024
β⇔देवपूर(धुळे),दि.16 (प्रतिनिधी :भागवत सोनवणे):- एकविरा देवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात संस्थेचे अध्यक्ष प्रशांत भाऊसाहेब व सचिव प्रदीप भाऊसाहेब यांच्या मार्गदर्शनाअंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. मुख्याध्यापिका/ प्राचार्या सौ. पी आर अहिरराव यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक आर बी भामरे व सर्व प्राध्यापक, ज्येष्ठ शिक्षक आर एन घोडके , एन एन पाटील , एस बी वाघ व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत बुद्धवंदना घेण्यात आली.
प्राचार्या सौ. पी आर अहिरराव यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय घटनेचे प्रमुख शिल्पकार म्हणून ओळखले जातात ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री देखील होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन संघर्षाने भरलेले होते. पण अवघ्या जगासाठी एक मूर्तीमंत उदाहरण बनले आहेत, ज्यातून सर्वांना प्रेरणा मिळते. त्यांनी संविधान रुपी समतेचा अधिकार दिला असं त्यांनी आपल्या व्याख्यानातून सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन एस बी वाघ यांनी केले.आभार प्रदर्शन पी. बी. पाटील यांनी केले.
β⇔ दिव्य भारत बीएसएम न्यूज : मुख्य संपादक : डॉ. भागवत महाले : मो. 8208180510